प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) 75 वा प्रजासत्ताक दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पूर कुकडेश्वर शाळेत विविध कार्यक्रमांनी संपन्न करण्...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
75 वा प्रजासत्ताक दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पूर कुकडेश्वर शाळेत विविध कार्यक्रमांनी संपन्न करण्यात आला. सकाळी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. शालेय ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप दिवटे व जिजाबाई गवारी यांच्या शुभहस्ते तर ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण सरपंच उषाताई चिमटे व सदस्य जितेंद्र आंबवणे यांचे शुभहस्ते संपन्न झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक असे लेझीम चे प्रात्यक्षिक सादर केले. विद्यार्थ्यांची भाषणे झाली. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले.उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले व भरघोस बक्षिसे दिली.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीम व सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रेक्षकांनी व ग्रामस्थांनी भरभरून दाद दिली .शेवटी सर्व विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांसाठी जेवणाचे नियोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक चंद्रकांत पारधी व शिक्षक सचिन मुळे यांनी केले.माजी मुख्याध्यापक दुंदा गवारी यांनी सर्वांचे आभार मानले.
COMMENTS