क्राईमनामा Live : कोयत्याने वार करत मित्राचा खून करून फरार झालेल्याला आरोपीला लोणीकंद पोलिसांनी पाटस टोल नाक्यावर शुक्रवारी (दि.1) सापळा र...
क्राईमनामा Live : कोयत्याने वार करत मित्राचा खून करून फरार झालेल्याला आरोपीला लोणीकंद पोलिसांनी पाटस टोल नाक्यावर शुक्रवारी (दि.1) सापळा रचून अटक केली. सागर अशोक गायकवाड (वय 32, रा. वाघजाई नगर,दौंड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर महेश साधू डोके (वय 21, रा. माऊली बालक आश्रम, वाडेबोल्हाई) या तरुणाचा खून झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर आणि महेश एकमेकांचे मित्र होते. लिफ्टच्या बहाण्याने दोन वर्षांपूर्वी त्यांचा परिचय झाला होता. सागर हादेखील उच्चशिक्षित असून, तो विवाहित आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद होता. त्यामुळे चिडलेल्या सागरने महेशच्या डोक्यावर, गळ्यावर कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून केला. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला होता. ही घटना मंगळवारी (दि.28) दुपारी दोनच्या सुमारास बकोरी रोड, वाघोली परिसरात घडली होती. याप्रकरणी, कृष्णकांत कमलेशकुमार यादव (वय 30, रा. आरव ब्लीस सोसायटी, राधेश्वरीनगरी बकोरी रोड, वाघोली) या प्रत्यक्षदर्शींनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार सागर गायकवाड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी चेन्नई एक्स्प्रेसने सागर पुण्याला येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दौंड तालुक्यातील रेल्वे क्रॉसिंगवर गाडी थांबली असताना तिथे उतरून पाटस टोलनाक्यावरून जात असताना सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गोडसे, सहायक फौजदार सकाटे, कर्मचारी जाधव आणि फरांदे यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत सागर याने खुनाची कबुली दिली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी दिली.
COMMENTS