मंचर : मंचर बेल्हे रस्त्यावर अनेक ठिकाणी गतिरोधक आहेत, परंतु त्यांना सफेद पट्ट्या नाहीत व झेब्रा क्रॉसिंग नाहीत त्यामुळे वारंवार अपघात होतात...
मंचर : मंचर बेल्हे रस्त्यावर अनेक ठिकाणी गतिरोधक आहेत, परंतु त्यांना सफेद पट्ट्या नाहीत व झेब्रा क्रॉसिंग नाहीत त्यामुळे वारंवार अपघात होतात. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थोरांदळे ही शाळा रस्त्यालगत आहे त्यामुळे तेथे दोन गतिरोधक असून झेब्रा क्रॉसिंग नाही व सफेद पट्टी पण नाही त्यामुळे येथे वारंवार अपघात होतात. लहान मुलांना देखील यामुळे रस्ता ओलांडताना धोका होऊ शकतो. सार्वजनिक रस्ते बांधकाम विभाग घोडेगाव पीडब्ल्यूडी यांना सामाजिक कार्यकर्ते संतोष गोपाळे व वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष पंकज सरोदे यांनी लेखी निवेदन दिले व या रस्त्याची वेळीच उपाययोजना करावी व लवकरात लवकर मंचर बेल्हा रस्त्यावरील गतिरोधकांना सफेद व झेब्रा क्रॉसिंग करावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी होईल.
मंचर बेल्हे रस्त्याचे दरवर्षी डागडुजींची कामे केली जातात परंतु ते काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे दरवर्षी मंचर बेल्हे रस्त्याची अवस्था व्यवस्थित नाही. अशा प्रकारचे लेखी निवेदन संतोष गोपाळे व पंकज सरोदे यांनी केली आहे.
COMMENTS