जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील मौजे सोनावळे पो. इंगळूण ता.जुन्नर जि. पुणे येथील वसंत सोमा रवते वय ३० वर्षे यांचा किल्ले शिवनेरी...
जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील मौजे सोनावळे पो. इंगळूण ता.जुन्नर जि. पुणे येथील वसंत सोमा रवते वय ३० वर्षे यांचा किल्ले शिवनेरी ते अयोध्या १५०० कि.मी असा पायी वारी प्रवास १० डिसेंबर २०२३ रोजी सुरू झाला आहे.
हातामध्ये काठी, गळ्यात भगवे उपरणे, पाठीवर साहित्य व कपड्यांची पिशवी त्याच डौलाने फडकणारा तिरंगा अशा वेशामध्ये किल्ले शिवनेरी ते अयोध्या प्रवास त्यांनी सुरू केला आहे.
अतिशय ग्रामीण भागातील हा तरूण असून वसंत रावते यांनी आपले ध्येय्य पूर्ण करण्याचा मानस केला आहे.
पुष्पा बबन सुपे- सामाजिक कार्यकर्त्या यांचा वसंत रावते यांचे ते भाऊ आहेत.
वसंत सोमा रावते यांचा जुन्नर तालुक्यासाठी अभिमानास्पद असा हा उपक्रम आहे.
COMMENTS