प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) यशवंतराव चव्हाण कला- क्रीडा महोत्सव सन 2023 - 2024 मोठ्या उत्साहामध्ये न्यु इंग्लिश स्कूल आंबोली येथे द...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
यशवंतराव चव्हाण कला- क्रीडा महोत्सव सन 2023 - 2024 मोठ्या उत्साहामध्ये न्यु इंग्लिश स्कूल आंबोली येथे दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी संपन्न झाल्या. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व अध्यक्षस्थानी गावचे उपसरपंच श्री पांडुरंग वामन भालचिम हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नारायणगाव मुक्ताई यात्रा कमिटीचे विश्वस्त व दानशूर व्यक्तिमत्व श्री विलास पाटे उद्योजक श्री बाबापरदेशी व क्रीडा शिक्षक श्री एच पी नरसोडे हे होते केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे प्रमुख व उच्छिल केंद्राचे केंद्रप्रमुख सौ पुष्पलता पानसरे आंबोली ग्रामपंचायतचे सदस्य सविता कोकणे विठ्ठल भालचिम युवराज मोहरे उपस्थित होते तर कार्यक्रम प्रसंगी उच्छिल केंद्रशाळेचे मुख्याध्यापक श्री अन्वर सय्यद मनोहर मोहरे मदन भालचिम कोंडीबा खुटाण अशोक कोकणे चिमा बुधा भालचिम हेमंत गवारी अक्षय घोडे पांडूरंग भालेराव हे होते तर शिक्षणा फांऊडेशनचे पोपट पोटे आदी गावातील मान्यवर तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब कोकणे सुरेश भालचिम दत्तात्रय भालेराव हे व्यासपिठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक न्यू इंग्लिश स्कूल आंबोली विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजय वाघ यांनी केले तर सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा व स्पर्धेविषयी माहिती केंद्रप्रमुख यांनी दिली तर त्यांनी या प्रकारच्या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा शालेय शिक्षणात खेळाचे महत्व व खेळासाठी वेळ आणि खेळातील आपल्या जीवनातील महत्त्व याबाबत उद्बोधन केले तर सुभाष मोहरे क्रीडा समन्वयक यांनी आज दिवसभरामध्ये वैयक्तिक सांघिक व सांस्कृतिक स्पर्धा मोठ्या उत्साहात व खेळणीच्या वातावरणामध्ये संपन्न झाल्या या स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील व गावातील क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर अशा प्रकारच्या स्पर्धा प्रथमच आपल्या गावामध्ये आयोजित केल्याबद्दल प्रशासनाचे व शिक्षण विभाग यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले सर्व प्रकारचे नियोजन व आयोजन आंबोली विद्यालय व जिल्हा परिषद शाळा यांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद आणि त्यांचे कर्मचारी यांनी केले होते.
केंद्रस्तरीय स्पर्धेच्या निमित्ताने न्यू इंग्लिश स्कूल आंबोली विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना मुक्ताई देवस्थान ट्रस्ट नारायणगावचे विश्वस्त श्री विलास तात्या पाटे यांच्या वतीने शालेय दप्तर कंपास पॅड शालेय गणवेश इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले की शिक्षणाचे महत्त्व स्पर्धेच्या युगात वावरताना स्वतःचे बालपण व डोंगरी आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन खेळाचे महत्व सांगून त्यांनी सहकार्याची भावना व्यक्त केली जेणेकरून ह्या शैक्षणिक साहित्याचा वापर आणि शिक्षणा विषयी असणारे महत्त्व व सामाजिक बांधिलकी जपूवणूक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी कायमस्वरूपी कटिबद्ध राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले
या स्पर्धेतील सर्व विजयी स्पर्धकांना केंद्रप्रमुख यांच्या वतीने प्रमाणपत्र व बक्षीसे देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी उच्छिल केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक त्यांचे सर्व सहकारी शिक्षक सर्व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत आंबोली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पूनम तांबे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब जाधव यांनी तर आभार क्रीडा समन्वयक व अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुभाष मोहरे यांनी केले.
COMMENTS