मंचर दि. १० डिसेंबर बैलगाडा शर्यतींना आपल्या समालोचनाने अफाट लोकप्रियता मिळवुन देणारे सर्व अनाऊंसरांना चांडोली बुद्रुक गावातील बैलगाडा श...
मंचर दि. १० डिसेंबर
बैलगाडा शर्यतींना आपल्या समालोचनाने अफाट लोकप्रियता मिळवुन देणारे सर्व अनाऊंसरांना चांडोली बुद्रुक गावातील बैलगाडा शर्यतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी तालुकाप्रमुख प्रा सुरेखा निघोट,प्रा.अनिल निघोट मा. तालुका प्रमुख भारतीय विद्यार्थी सेना आणि बाबाजी शेठ कराळे शिवसेना समन्वयक आंबेगाव तालुका यांच्या वतीने समाज भूषण, आंबेगाव भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हजारो बैलगाडाशौकीन,बैलगाडा मालक,यात्रा कमिटी चे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
चांडोली येथे हरिनाम सप्ताहानिमित्त चार दिवस चालणारया बैलगाडा शर्यतीत६८० बैलगाडा सहभागी झाले असुन ८ ते ११ डिसेंबर स्पर्धा चालणार असुन ४ लाख ४४ हजार तिसऱ्या वर्षांसाठी तर प्रथम क्रमांक १ लाख ११हजार बक्षीस असुन बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून रविंद्र थोरात, दौलत थोरात, सेकंदाचे कामकाज रविंद्र थोरात,कचरू थोरात तर निशानावर सुधाकर खांडगे आहेत. यात्रेची व्यवस्था प्रविण थोरात,राहुल थोरात,पवा थोरात, अक्षय खरमाळे, कमलेश वाळे, शंकर थोरात, अरुन थोरात हे यात्रेची जबाबदारी पार पाडत आहेत.
या यात्रोत्सवात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्व बैलगाडा अनाऊंसरांना बैलगाडे पुकारून शर्यतींना प्रसिद्धी व बैलगाडाशौकिनांना उत्साहात समालोचन करत असल्याबद्दल तेजेश बांगर,ऊमेश थापेकर, नवनाथ वाळुंज, स्वप्निल टेमगीरे प्रदिप भोर,सौरभ पवार यांना समाज भूषण तर साहेबराव आढळराव , लक्ष्मण बांगर, बाळासाहेब टेमगीरे, बबनराव मेंगडे यांना आंबेगाव भुषण पुरस्काराने गौरवण्यात आले.
यावेळी पोपट थोरात, संदिप थोरात,रामनाथ बांगर,लांडेवाडी येथील मा.सरपंच बाळासाहेब निसाळ,संदिप शेवाळे,तानाजी मलिक ,उपस्थित होते.
COMMENTS