प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) यशवंतराव चव्हाण कला- क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव सन 2023-2024 शिवनेरी फाऊंडेशन खानापूर येथे आयोजित तालु...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
यशवंतराव चव्हाण कला- क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव सन 2023-2024 शिवनेरी फाऊंडेशन खानापूर येथे आयोजित तालुकास्तरीय लोकनृत्य स्पधेत पश्चिम भागातील प्रथमच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल शाळेतील मुलींनी लोकनृत्य स्पर्धा मोठ्या गटात प्रथम क्रमांक मिळविला जिल्हा परिषद पुणे येथे जिल्हास्तरावर दुसऱ्यांदा जाण्याची संधी मिळणार आहे यामुळे शाळेतील सर्व मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद ओसांडून वाहत होता तर जिल्हास्तरावर जाण्याची संधी प्राप्त झाल्याबद्दल मुले खूश होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बक्षिस वितरण जुन्नर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ.अनिता शिदे, विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे , सुशीला डुंबरे, सिंधू साळवे तर केंद्रप्रमुख पुष्पलता पानसरे , संजय जाधव आदी मान्यवर तर यानिमित्ताने अभिनंदन आपटाळे बीटच्या विस्तार अधिकारी सौ संचिता अभंग, शालेय समितीचे अध्यक्ष सचिन नवले, मा. अध्यक्ष शरद नवले,उपाध्यक्ष सागर बगाड मा. उपाध्यक्ष गणपत भालेराव सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य तसेच सर्व पालक ग्रामस्थ यांनी सर्व विद्यार्थीनींनीचे आणि सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे यावेळी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक अन्वर सय्यद पदवीधर शिक्षक सुभाष मोहरे सौ स्मिता ढोबळे , लिलावती नांगरे , आरती मोहरे यांचेही कौतूक केले.
COMMENTS