चावंड : सागर माथां गिर्यारोहण संस्था भोसरी पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतीने नुकताच चावंड येथे आरमार्क हा सामाजिक उपक्रम संपन्न झाला यानिमि...
चावंड : सागर माथां गिर्यारोहण संस्था भोसरी पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतीने नुकताच चावंड येथे आरमार्क हा सामाजिक उपक्रम संपन्न झाला यानिमित्ताने पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक मा. अरुण बोराडे त्याचबरोबर इतिहास अभ्यासक व ही चिंचवडे, डॉ संग्राम इंदोरे, निलेश गावडे,शिवाजी ट्रेल चे विनायक खोत हे उपस्थित होते.सागर माथा संस्थेच्या वतीने दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये कै. रमेश गुळवे यांच्या स्मृती प्रित्यर्थ विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. यावर्षी किल्ले चावंड उर्फ प्रसन्नगड येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दिनांक 16 डिसेंबर रोजी किल्ले चावंड येथे शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर, सागर माथा संस्थेच्या विविध सभासदांच्या मदतीने श्री अमोल ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गड स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सायंकाळी स्थानिक युवकांसाठी व्यसनमुक्ती आणि करियर गायडन्स बाबत मार्गदर्शक व्याख्यान श्री अरुणजी बोराडे यांनी दिले. त्याचबरोबर रविवार दिनांक 17 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चावंड येथे ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात येऊन विविध शालेय उपयोगी पुस्तके ग्रंथ या शाळेस उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री व्ही आर धोंडगे विस्ताराधिकारी पंचायत समिती जुन्नर, श्री यश मस्करे अध्यक्ष जुन्नर पर्यटन विकास संस्था , सरपंच सौ सुमन लांडे ,सुरेश जोशी ,सुनील शेलकंदे,पंढरीनाथ लांडे सर , श्री नारद गुळवे, एव्हरेस्ट विर श्रीहरी तापकीर,सागरमाथा संस्थेचे अध्यक्ष प्रवीण हरपळे , सुमित दाभाडे ,पांडुरंग शिंदे आणि संस्थेचे सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
COMMENTS