प्रतिनिधी : प्रा.अनिल निघोट ( सर ) पारगाव दि २८ डिसेंबर आंबेगाव तालुक्याच्या पुर्व पट्ट्यातील पारगाव कारखाना येथे दत्तजयंतीनिमित्त २६ ते २...
प्रतिनिधी : प्रा.अनिल निघोट ( सर )
पारगाव दि २८ डिसेंबर आंबेगाव तालुक्याच्या पुर्व पट्ट्यातील पारगाव कारखाना येथे दत्तजयंतीनिमित्त २६ ते २८ डिसेंबर रोजी ४५० बैलगाडयांसह भव्य बैलगाडा शर्यती पार पडल्या. ज्यात बाळासाहेब खैरे सविंदणेयांचा बैलगाडा विशेष आकर्षण ठरला. सेकंदावर सचिन ढोबळे, गोविंद पवार तर निशानावर संग्राम ढोबळे यांनी काम पाहिले.यात्रा कमिटी अध्यक्ष राजुशेठ ढोबळे, उपाध्यक्ष सचिन ढोबळे यांच्या बरोबर च किरण ढोबळे ग्रा पं सदस्य, लक्ष्मण ढोबळे ,लक्ष्मण गाढवे व ग्रामस्थांनी यात्रेचे ऊत्तम नियोजन केले.
यात्रेत अनाऊंसर ज्ञानेश्वर माऊली पिंगळे, अर्जुन विधाटे, अण्णासाहेब जाधव, बाळासाहेब टेमगीरे, बबनराव मेंगडे, राहुल किटे, पोपट शिंगाडे, बाळासाहेब शेळके,नवनाथ वाळुंज यांनी आपल्या पहाडी आवाजात शर्यतीचे समालोचन करुन बैलगाडा शौकीनांची मने जिंकली.
यात्रेस पोलिस ऊपनिरीक्षक लहु थाटे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
तर प्राध्यापक सुरेखाताई निघोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख महिला आघाडी आंबेगाव,प्रा.अनिल निघोट मा तालुका प्रमुख भारतीय विद्यार्थी सेना यांच्या वतीने अनाऊंसर बांधवांना समाज भूषण पुरस्कार देण्यात आले. यावेळी सरपंच श्वेता ढोबळे बैलगाडा मालक राजुशेठ बांगर, अर्जुन वाव्हळ,वाघ चेअरमन, देवराम ढोबळे, रावसाहेब रोकडे,संदिप हिंगे,पानमंद सरपंच यावेळी उपस्थित होते.
यात्रेत विशेष चर्चा राहुल झुंजारराव हांडे देशमुख निरगुडसर यांच्या देवा बैलानं घोडेगाव घाटात एकट्यानं बारी नंबरात बसवल्याची बैलगाडा रसिकांच्या तोंडी चर्चा व कौतुक दिसत होते.
COMMENTS