प्रतिनिधी : प्रा.अनिल निघोट ( सर ) चर्होली बैलगाडा स्पर्धेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख प्राध्यापक सुर...
प्रतिनिधी : प्रा.अनिल निघोट ( सर )
चर्होली बैलगाडा स्पर्धेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट, भारतीय विद्यार्थी सेना तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट, शिवसेना तालुका समन्वयक बाबाजी शेठ कराळे, राष्ट्रीय खेळाडू पोपटराव थोरात यांचे वतीने समालोचक माऊली पिंगळे, प्रदिप भोर, निलेश रणपिसे, सुनिल मोरवे, अभिषेक ढेरंगे, स्वप्निल सोनवणे, बबनराव मोहिते, माऊली तळेकर यांना बैलगाडा शर्यतीचे अनाउंसिंग करून बैलगाडाशौकिन,मालक शर्यतीतील बैलांना आपल्या पहाडी आवाजाने निवेदन करून शर्यतींना अफाट लोकप्रियता मिळवुन दिल्याबद्दल समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी किरण गवारे ऊपतालुकाप्रमुख शिवसेना,साहेबराव आढळराव,लक्ष्मण बांगर प्रसिद्ध बैलगाडा मालक सुखदेव भुजबळ,सरपंच कासारी शिरूर, शंकरशेठ काटे पिंपळे सौदागर, अविनाश वाबळे मोई, अरुण घुंडरे पाटील आळंदी, विकास नायकोडी चाकण, शशिकांतशेठ सणस, पप्पशेठ पिंगळे, सत्यवान कोतवाल, तुषार चांदेरे सुस, शिवाजी कोतवाल, शिवसेना,पांडुरंग पगडे भारतीय कामगार सेना ऑर्बिट कोटींग कंपनी युनिट अध्यक्ष, शालनताई पगडे ग्रा.पं.सदस्य चर्होली अनिल मावकर उपस्थित होते.
येथील भव्य बैलगाडा शर्यतीत पहिल्या क्रमांकात येणाऱ्या बैलगाडयासाठी ८३ मोटरसायकल, घाटाच्या राजासाठी चार चांदीच्या गदा,कार, बोलेरो पिकप,ट्रॅक्टर,स्कॉरपिओ,टाटा एस गोल्ड, बुलेट अशा बक्षिसांची खैरात होती.१३ ते १७ डिसेंबर स्पर्धेत हजारोंची उपस्थिती होती.घाटाचा राजारामभाऊ वारींगे वारंगवाडी मावळ सह सचिन नवले दावडी सेकंद ११.२७ हा ठरला.
शेवटच्या दिवशी मेगाफायनलला ५० तर फायनलला २० बैलगाडे सहभागी झाले ज्यात मोरे चिखली व जयसिंग घेवडे ११. ५४ सेकंदासह स्काॅर्पिओ सह साहेब केसरी किताबाचा तर रामभाऊ वारिंगे ११.६१, ज्ञानेश्वर काळोखे ट्रॅक्टर चा मानकरी ठरला.
आयोजक मी सेवेकरी सोशल फाउंडेशन चे सुधीर मुंगसे आणि सोमनाथ मुंगसे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह ऊत्तम नियोजन केल्याने ७५० बैलगाडा मालक सहभागी झाले .
COMMENTS