अमीन शेख शेगाव प्रतिनिधी अकोला जिल्हा चोहट्टा बाजार जिल्हा परिषदेच्या पोटनिवडनुकीत वंचित आघाडीचे उमेदवार योगेश पंजाबराय वडाळ २७८१ मते घेव...
अमीन शेख शेगाव प्रतिनिधी
अकोला जिल्हा
चोहट्टा बाजार जिल्हा परिषदेच्या पोटनिवडनुकीत वंचित आघाडीचे उमेदवार योगेश पंजाबराय वडाळ २७८१ मते घेवून विजयी झाले. प्रतिस्पर्धी भाजप उमेदवाराचा पराभव करीत प्रहार, काँग्रेस व ठाकरे गटाचा त्यांनी धुव्वा उडवला.
गेल्या अनेक वर्षापासून अकोला जिल्हा परिषद वर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा आहे आता झालेल्या जि, प, पोटनिवडणुकीत बीजेपीच्या उमेदवाराचा पराभव करून वंचित आघाडीने गड राखला त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आहे
यातच मुस्लिम कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांनी अकोला येथील चौकामध्ये बीजेपीला हरवल्याचा मोका मिळाल्याबद्दल चे बॅनर हातात घेऊन पेढे वाटप केला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता इम्तिहाज नदाफ यांनी येतो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है अशा शब्दात येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा दणदणीत विजय घडवून येणार असल्याचे मुस्लिम बांधवांच्या वतीने प्रदेश प्रवक्ता म्हणून ते बोलत होते सत्तेचे घराणेशाही व राजकारणाचे हुकूमशाही करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी समस्त मुस्लिम बांधवांनी व बहुजनांनी अड, प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले
जि.प माजी कृषी सभापती के. पंजाबराव वडाळ यांच्या आकस्मिक निधनानंतर चोहट्टा बाजार जिल्हा परिषद सर्कलची जागा रिक्त झाली होती. राज्य निवडणूक आयोगाने वर्षभरानंतर कार्यक्रम जाहीर केला. दरम्यान ही निवडणूक अविरोध होईल का? अशी चर्चा असताना सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीत उडी घेतली व निवडणूक प्रतिष्ठेची केली. यामध्ये वंचित सह भाजप काँग्रेस शिवसेना ठाकरे गट व प्रहार पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. जोरदार प्रचारही केला पंचरंगी लढत दिसत असली तरी या मतदारसंघात प्रत्यक्षात भाजप बंचित मध्ये थेट लढत झाली. त्यामध्ये बंचित ने आपली जागा कायम ठेवत भाजपला जोरदार झटका दिला.
COMMENTS