प्रतिनिधी : नवनाथ मोरे जुन्नर : जुन्नर तालुका वकील बार असोसिएशनच्या प्रतिवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड.हेमंत किसन भास्कर ११७ मते मिळवून ...
प्रतिनिधी : नवनाथ मोरे
जुन्नर : जुन्नर तालुका वकील बार असोसिएशनच्या प्रतिवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड.हेमंत किसन भास्कर ११७ मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी मावळते अध्यक्ष ॲड.अरुण गाडेकर यांना ८६ मते मिळाली. तर सचिव पदासाठी झालेल्या निवडणुकीत ॲड.आशिष वानखेडे (१२२) मते मिळवीत यांनी विजय मिळविला. तसेच उपाध्यक्षपदी ॲड. हेमंत हडवळे (१८३) ॲड.समीर पुरवंत (१२९) मते मिळवीत विजयी झाले पराभूत ॲड.अजीज खान यांना ८८ मते मिळाली. चुरशीच्या झालेल्या या लढतीत एकूण २१८ मतदारांपैकी २०४ मतदारांनी आपला मतदनाचा हक्क बजावला होता.
सचिवपदी ॲड.आशिष वानखेडे (१२२) मते मिळवीत विजयी झाले तर प्रतिस्पर्धी ॲड.पुराणिक नलावडे ( ८०) मते मिळाली. सहसचीव महिला राखीव पदावर ॲड.वृषाली वाळुंज-मोरे, खजिनदारपदी विनय ढमढेरे, लेखापरीक्षकपदी ॲड.डिंपल शेटे-घाडगे यांची बिनविरोध निवड झाली होती. ग्रंथपालपदी ॲड.समकित नानावटी १०७ मते मिळवीत विजयी झाले.
कार्यकारीणी सदस्यपदी ॲड.सिध्देश वाघोले (१७८ मते) प्रकाश रोकडे (१७२) प्रविण मदगुले (१३० ) विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड.शरद गुरव, ॲड.कृष्णकांत ढमढेरे, ॲड.रेवन कोंडेकर यांनी काम पाहिले.
COMMENTS