प्रतिनिधी : पंकज सरोदे महाराष्ट्राची लाईफ लाईन म्हणजेच कामगार वर्ग, कामगारांच्या न्याय हक्कासाठी व कंत्राटी भरती व इतर कामगारांच्या प्रश्नाव...
प्रतिनिधी : पंकज सरोदे
महाराष्ट्राची लाईफ लाईन म्हणजेच कामगार वर्ग, कामगारांच्या न्याय हक्कासाठी व कंत्राटी भरती व इतर कामगारांच्या प्रश्नावर काम करणारी एकमेव संघटना म्हणजेच "वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन" च्या वतीने आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार, आद सुरेशजी मोहिते साहेब (महाराष्ट्र सरचिटणीस) यांच्या अधिपत्याखाली कामगारांची बैठक Four seasons hotel वरळी या ठिकाणी संपन्न झाली. आंबेडकर भवन येथे तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी बरोबर बैठक करण्यात आली. येत्या 28 जानेवारी 2024 रोजी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन च्या वतीने होणार मुंबई या ठिकाणी होणाऱ्या कामगार मेळावा या मिळवण्यासाठी सर्व जिल्ह्यातून कामगार येणार असून, कामगार मिळावे चे नियोजनसाठी उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती - ज्योतिर्लिंग स्वामी (सोलापूर जिल्हा अध्यक्ष), सूरज अरखराव,(सोलापूर सरचिटणीस), सुनील लोखंडे (मुंबई सचिव), प्रदीप गौतम साळवे (नवी मुंबई निरक्षक व घाटकोपर तालुका अध्यक्ष), युसुफ अन्सारी (शिवाजीनगर - मानखुर्द तालुका अध्यक्ष), चिराग सोलंकी (मुलुंड तालुका अध्यक्ष), अजय वानखडे, निखिल गायकवाड, व कार्यकर्ते.
COMMENTS