प्रतिनिधी : प्रा.अनिल निघोट ( सर ) म्हाळुंगे पडवळ येथील ठाकूरवाडी, आदिवासी वस्ती च्या भैरवनाथ क्रिकेट क्लब च्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्...
प्रतिनिधी : प्रा.अनिल निघोट ( सर )
म्हाळुंगे पडवळ येथील ठाकूरवाडी, आदिवासी वस्ती च्या भैरवनाथ क्रिकेट क्लब च्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन प्रा.अनिल नारायणशेठ निघोट,मा. तालुकाप्रमुख भारतीय विद्यार्थी सेना यांचे हस्ते करण्यात आले, प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक भाऊसाहेब चासकर, सामाजिक कार्यकर्ते नितीन पडवळ, पत्रकार दत्ता नेटके,प्रशांत सैद, प्रकाश आवटे, बाळासाहेब जाधव क्रिकेट क्लब पदाधिकारी अक्षय काळे,पप्पु काळे,लक्ष्मण जाधव, प्रदिप जाधव, पुंडलिक मराठे, राहुल काळे, स्वप्निल मेंगाळ, लक्ष्मण केदार आदि उपस्थित होते.
यावेळी प्रा.अनिल निघोट यांनी हुतात्मा बाबू गेनु, अण्णासाहेब आवटे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर आज आदिवासी, ठाकर समाजातील युवक मंडळाने ठेवलेल्या या क्रिकेट स्पर्धेस ४० पेक्षा जास्त संघानी सहभाग घेतला असुन स्पर्धा उत्साहात व शांततेत पार पाडावी असे आवाहन करुन पाच दिवस चालणारया या भव्य स्पर्धेस व आयोजकांस शुभेच्छा दिल्या.
सुत्रसंचलन अक्षय काळे तर आभार पप्पु काळे यांनी मानले.
COMMENTS