विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) जुन्नर : श्री शिवछत्रपती महाविद्यालयाच्या पद्मभूषण शरदचंद्रजी पवार इनडोअर स्पोर्टस हॉल येथे अभ्यास...
विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
जुन्नर : श्री शिवछत्रपती महाविद्यालयाच्या पद्मभूषण शरदचंद्रजी पवार इनडोअर स्पोर्टस हॉल येथे अभ्यासेतर उपक्रमाअंतर्गत आरोग्य विभागामार्फत मोफत आरोग्य तपासणी (बी.एम.आय.) कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.पी.एस.लोढा ,पर्यवेक्षक प्रा.एस.ए.श्रीमंते ,व तसेच आरोग्य व आहार तज्ञ सौ.माधवी देसाई , सौ छाया आमले सौ सीमा भराडे ,कौस्तुभ देसाई, आरोग्य विभाग प्रमुख प्रा एन.एम.धर्माधिकारी,प्रा.एम.एस.बोंबले व इतर प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमास महाविदयालयातील ७१ प्राध्यापक, प्राध्यापिका यांनी आरोग्य तपासणी (बी.एम.आय) करून आपल्या आरोग्याबाबत कशी काळजी घ्यायची याची माहिती प्राप्त करून घेतली.आरोग्य विभागाने या उपक्रमास पुर्णपणे सहकार्य केले.
तसेच सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष ॲड.संजय शिवाजीराव काळे, अध्यक्ष प्रतिनिधी.व्ही.बी कुलकर्णी,प्राचार्य डॉ. एम.बी.वाघमारे यांनी या आरोग्य तपासणी उपक्रमास बहुमोल मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
COMMENTS