आरोग्य टिप्स - कोथिंबिरीमध्ये शीत गुणात्मक , पाचक असे गुणधर्म तसेच कॅल्शिअम , फॉस्फरस , लोह , अ , ब , क जीवनसत्त्व , पोटॅशिअम , प्रथिने , स्...
आरोग्य टिप्स - कोथिंबिरीमध्ये शीत गुणात्मक, पाचक असे गुणधर्म तसेच कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, अ, ब, क जीवनसत्त्व, पोटॅशिअम, प्रथिने, स्निग्धता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ हे घटक असतात. कोथिंबिरीचा उपयोग आहाराबरोबरच औषधी वनस्पती म्हणूनही वापर केला जातो. जाणून घ्या कोथिंबीर खाण्याचे फायदे आणि कोणत्या आजारांवर प्रभावी आहे याविषयी माहिती –
आम्लपित्त
आम्लपित्तामुळे घशामध्ये व छातीमध्ये जळजळ होत असेल
व घशासी आंबटपाणी येत असेल तर एक चमचा धणेपूड व एक चमचा पूड केलेली खडीसाखर यांचे
मिश्रण दिवसातून दोन-तीन वेळा घ्यावे. यामुळे आम्लपित्ताचा त्रास कमी होतो.
पोटाचे विकार
रोजच्या जेवणामध्ये ताज्या कोथिंबिरीची चटणी १-२
चमचे खाल्ली असता अपचन, आम्लपित्त, अन्नावरील वासना कमी होणे, पोटफुगी, अल्सर, मूळव्याध आदी
विकार होत नाहीत. अन्नपचन नीट न झाल्याने जर जुलाब होत असतील तर अशा वेळी धण्याचा
ग्लासभर पाण्यात काढा करून प्यावा यामुळे जुलाब थांबतात.
मधुमेह
कोथिंबीर मधुमेहाच्या रूग्णांसाठी गुणकारी आहे.
कोथिंबीर रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित करते.
हिमोग्लोबिन, रक्ताची कमतरता
कोथिंबीर शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी गुणकारी
आहे. कोथिंबीरमध्ये मुबलक प्रमाणात लोह, खनिजे, जीवनसत्त्वे अ आणि सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे शरीरात
रक्ताची कमतरता भरून काढण्यात मदत करतात.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर
कोथिंबीरमध्ये व्हिटामिन ए भरपूर प्रमाणात आहे, जे
डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते.
मुतखडा
कोथिंबीर पाण्यात उकळा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या, हळूहळू
मूत्रमार्गाने मूत्रमार्गातून मुतखडा पडून जाऊ शकतो.
विषारी घटक, कोलेस्ट्रेरॉल
रोज सकाळी कोथिंबीर पाने १०-१२ व पुदिना पाने ७-८
पाण्यातून उकळून घेतल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. तसेच शरीरातील
कोलेस्ट्रेरॉलचे वाढलेले प्रमाण कमी होण्यास मदत होते.
उष्णता
हातापायांची उष्णतेमुळे जळजळ होत असेल तर एक चमचा
धणे व जिरे रात्री पाण्यात भिजत घालावे व सकाळी उठल्यावर पाण्यामध्ये कुस्करून ते
पाणी गाळून प्यावे.
अशक्तपणा
दोन चमचे कोथिंबीरच्या रसामध्ये १० ग्राम खडीसाखर
आणि आर्धी वाटी पाणी मिळवा. हे मिश्रण सकाळ संध्याकाळ प्यायल्याने अशक्तपणा कमी
होण्यास मदत होते.
स्थूलता
स्थूलता कमी करण्यासाठी एक चमचा धणे, एक चमचा आवळा
पावडर, अर्धा इंच आलं हे मिश्रण पाण्यात उकळून ते पाणी प्यावे.
टीप – वर दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे.
इतर औषधे सुरु असतील तर वरील उपचार वैद्यकीय सल्ल्याने करावेत.
COMMENTS