विशेष प्रतिनिधी - प्रा. निलेश आमले ( सर ) १०ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त सोमवार दि.१६ ऑक्टोबर २०२३ रोजी श्री शिवछत्रपती महाविद...
विशेष प्रतिनिधी - प्रा. निलेश आमले ( सर )
१०ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त सोमवार दि.१६ ऑक्टोबर २०२३ रोजी श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे समुपदेशन विभागाच्या उद्घाटन प्रसंगी मा.प्रा.डॉ.एजाज शेख (प्रसिद्ध समुपदेशक,व्याख्याते, मानसशास्त्राचे अभ्यासक) यांचे "मानसिक आजारांची जाणीव आणि देखभाल" या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.
याप्रसंगी मा.डॉ.एजाज शेख यांनी विद्यार्थ्यांमधे सामील होऊन विविध उदाहरणे देवून मानसिकतेचे विविध पैलू आणि मानसिक आजारांचे गांभीर्य व त्याची देखभाल अत्यंत सहजतेने विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारावा यांचे महत्त्व पटवून दिले.
अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी.कुलकर्णी,महाविद्यायचे प्राचार्य डॉ.एम.बी वाघमारे,कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.पी.एस.लोढा,पर्यवेक्षक प्रा.एस.ए.श्रीमंते,व्यवसाय विभाग प्रमुख प्रा.के जी.नेटके,कला विभाग प्रमुख प्रा.आर.एस.कांबळे तसेच विज्ञान विभाग प्रमुख प्रा.एस.एम.इंगळे, तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समुपदेशन मंडळाचे प्रमुख प्रा.वाय.डी.घोडके यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.सौ.व्ही.एच.सावंत तर आभार प्रदर्शन प्रा.सौ.एम.डी.हाडवळे यांनी केले.
COMMENTS