घंगाळदरे : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील घंगाळदरे येथील शेती व वस्तीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने वस्तीकडे जाता येत नव्हते मात्र या ...
घंगाळदरे : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील घंगाळदरे येथील शेती व वस्तीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने वस्तीकडे जाता येत नव्हते मात्र या रस्त्याचा मागील काही वर्षांपासून न्यायालयिन वाद सुरू होता.
दरम्यान घंगाळदरे येथील गावातील लोकांना जाताना मोठी कसरत करूनच जावे लागत होते, मात्र या रस्त्यासंदर्भात तहसिलदार जुन्नर, उपविभागीय अधिकारी जुन्नर आंबेगाव, तसेच न्यायालयाने या रस्त्याला मंजुरी देत रस्त्याला खुले करण्यासाठी परवानगी दिली, अखेर ५ ऑक्टोबर २०२३ रोजी पोलिस संरक्षणात भोजने हवालदार, मंडलाधिकारी पोटकुले भाऊसाहेब, जाधव भाऊसाहेब तलाठी यांच्या स्थळपाहणीनुसार सुरू करण्यात आला, यावेळी सरपंच संतोष तळपे, पोलीस पाटील नितिन नंदू तळपे, बुधा रामभाऊ तळपे तंटामुक्ती अध्यक्ष हजर होते. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व्हे बांधावरून जेसीबीच्या सहाय्याने रस्ता करून घेतला, घंगाळदरे ग्रामपंचायत कार्यालय भगतवाडी ते आंबेदरी रस्त्याचे काम पूर्ण झाले. रस्ता नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिला.
COMMENTS