कॉफीमध्ये कॅलरीचं प्रमाण खूपच कमी असतं. त्यामुळे दुधापासून बनवलेल्या कॉफी पेक्षा ब्लॅक कॉफी पिण्याचे अधिक फायदे आहेत. जाणून घ्या ब्लॅक कॉफ...
कॉफीमध्ये कॅलरीचं प्रमाण खूपच कमी असतं. त्यामुळे दुधापासून
बनवलेल्या कॉफी पेक्षा ब्लॅक कॉफी पिण्याचे अधिक फायदे आहेत. जाणून घ्या ब्लॅक
कॉफी पिण्याचे फायदे –
स्मरणशक्ती वाढते
ब्लॅक कॉफी मेंदूवर चांगला परिणाम करते. ब्लॅक कॉफी पिण्याने तुमचा
मेंदू तल्लख राहतो आणि स्मरणशक्तीही चांगली राहाते. तसेच नर्व्हस सिस्टिमही
ऍक्टिव्ह राहते.
वेटलॉस
व्यायाम करण्याच्या अर्धा तास आधी ब्लॅक कॉफी पिल्याने मेटाबॉलिजम 50
टक्के वाढतं आणि शरीरातील आणि चरबी कमी होण्यासाठी मदत होते.
एनर्जी
कॅल्शियम आणि पोटॅशियम हे पोषक तत्व असल्याने तुम्ही दिवसभरात
उत्साही राहाता. तसेच ब्लॅक कॉफीने वर्कआऊट दरम्यान परफॉर्मन्स वाढण्यास मदत
मिळते. वर्कआऊट करण्यासाठी शंभर टक्के एनर्जी मिळते. कॉफीमध्ये कॅफेनची मात्रा
अधिक असल्याने ब्लॅक कॉफी प्यायल्यावर अधिक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरात अधिक
उत्साह निर्माण होतो.
मानसिक स्वास्थ्य
मूड चांगला करण्यासाठी ब्लॅक कॉफी फायदेशीर ठरते. यातील कॅफेन
हार्मोन्समध्ये ऊर्जा निर्माण करून तुमचा मूड चांगला राहण्यासाठी मदत करतात.
टॉक्झिन्स काढून
टाकण्यासाठी मदत
शरीरात जमा झालेले हे टॉक्झिन्स काढून टाकण्यासाठी ब्लॅक कॉफीचा
उपयोग होतो. त्यामुळे पोट साफ करण्यास ब्लॅक कॉफीचा फायदा होतो.
टीप – ब्लॅक
कॉफीचे अतिसेवन करू नये. त्यामुळे तुमच्या शरीराला हानीही पोहचू शकते. दिवसातून २
कपापेक्षा ब्लॅक कॉफी पिणे शक्यतो टाळावे.
COMMENTS