विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) आज दि.०३ ऑक्टोंबर २०२३ रोजी श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे वाड्.मय मंडळ विभागाच्या उद्घाटन...
विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
आज दि.०३ ऑक्टोंबर २०२३ रोजी श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे वाड्.मय मंडळ विभागाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे मा.श्री उत्तम सदाकाळ सर (प्रसिद्ध कवी, लेखक,व्याख्याते) यांचे "आदर्श समाज निर्मितीमधील साहित्य क्षेत्राचे योगदान" या विषयावर व्याख्यान आयोजीत केले होते. याप्रसंगी मा.उत्तम सदाकाळ यांनी विद्यार्थ्यांना अगदी रंजक पद्धतीने विविध उदाहरणे,दाखले देवून,तसेच त्यांच्या विनोदी कथा, कवित सांगून व्याख्यानाच्या विषयाची खोली अत्यंत सहसजतेने विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.विद्यार्थ्यांना साहित्यनिर्मितीचे महत्त्व पटवून दिले.
या प्रसंगी जु.ता.शि.शि.प्र. मंडळ संस्थेचे सहसचिव मा.श्री सुभाषराव कवडे साहेब,अध्यक्ष प्रतिनिधी मा.प्रा.व्ही.बी. कुलकर्णी सर तसेच संस्थापदाधिकारी, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मा.प्रा.डॉ.एम.बी वाघमारे सर,कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.पी.एस.लोढा मॅडम,पर्यवेक्षक प्रा.एस.ए.श्रीमंते सर, इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
प्रा.लोढा मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी केवळ परिक्षार्थी न होता ज्ञानार्थी झाले पाहिजे असा उपदेश त्यांच्या अध्यक्षीय मनोगतामधून केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाड्.मय मंडळाचे प्रमुख प्रा.जी.एम.रोकडे सर यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.व्ही.एच.सावंत तर आभार प्रदर्शन प्रा.एन.एम.धर्माधिकारी यांनी केले.
COMMENTS