रत्नागिरी - विश्व समता कलामंच व D.B.A. चे संस्थापक - अध्यक्ष मा.मनोज जाधव सर यांचा नंदाई प्रतिष्ठान हातखंबा रत्नागिरी तर्फे विशेष सन्मान क...
रत्नागिरी - विश्व
समता कलामंच व D.B.A.चे संस्थापक - अध्यक्ष मा.मनोज जाधव सर
यांचा नंदाई प्रतिष्ठान हातखंबा रत्नागिरी तर्फे विशेष सन्मान करण्यात आला.
बुध्द, शिवराय
,फुले, शाहू,आंबेडकर यांच्या
क्रांतिकारी विचारांची जोपासना करत गेली १८ वर्षे अविरतपणे विश्व समता कलामंच
लोवले , संगमेश्वर या संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक,
साहित्यिक,सांस्कृतिक, धार्मिक,
कला, क्रीडा, जल पर्यावरण
क्षेत्रात अतिशय नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या तसेच गेल्या तीन वर्षांपासून
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर
कार्यकरणाऱ्या D.B.A. अर्थातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर
साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी भारत (रजि.) या दोन्ही संस्थेचे संस्थापक
-अध्यक्ष मा. मनोज जाधव सर यांच्या
प्रेरणादायी व विधायक कार्याबद्दल नंदाई प्रतिष्ठान हातखंबा, रत्नागिरी
तर्फे अध्यक्ष मा.विद्याधर कांबळे यांच्या हस्ते भारतीय संविधानाची प्रत,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र, व राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे तैलचित्र तसेच नंदाई लक्षवेधी सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रम चे अध्यक्ष मा.अनंत सावंत, प्रमुख उपस्थिती मा. गटविकास अधिकारी जे.पी.जाधव, सविधान संपादक मा.अमर पवार, निवुत्त शिक्षण विस्तार अधिकारी मा. मनिष कांबळे, पि. एस. आय. निलम जाधव, कु.प्रांजली कांबळे व रत्नागिरी मधील विद्यार्थी, पालक, व मान्यवर अतिथी उपस्थित होते.
COMMENTS