क्राईमनामा Live न्युज नेटवर्क : दि. २७/०९/२०२३ रोजी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामधील लांडेवाडी या गावांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्य...
क्राईमनामा Live न्युज नेटवर्क : दि. २७/०९/२०२३ रोजी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामधील लांडेवाडी या गावांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसुती दरम्यान डॉक्टरांच्या व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे लांडेवाडी गावचे शिवाजी दादू लवांडे यांची मुलगी अश्विनी बाळू केसकर यांचा बाळंतपणाच्या वेळी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तडफडून मृत्यू झाला असे निवेदन मुलीच्या नातेवाईकांनी व मुलीच्या आई-वडिलांनी वंचित बहुजन आघाडी आंबेगाव तालुका अध्यक्ष श्री शिवाजी नामदेव राजगुरू यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दिली होती त्यानंतर वंचित बहुजन आघाडी तर्फे दि. २७/०९/२०२३ रोजी वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्त्यांसह लांडेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपस्थित असणारे डॉ. पूजा बहिर यांच्याकडे लेखी स्वरूपात झालेल्या प्रकरणाचा जाब विचारण्याचे निवेदन देण्यात आले,
डॉ.पूजा बहिर यांच्याबरोबर वंचित बहुजन आघाडीचे ढाण्या वाघ आमचे प्रदिप गौतम साळवे व बौद्ध सेवा संस्थेचे मुंबई अध्यक्ष शशिकांतजी भालेराव साहेब यांनी डॉक्टरांशी चर्चा करून लवकरात लवकर आम्हाला लेखी स्वरूपात कळवावे असे चर्चा केल्यास डॉक्टरांनी लवकरात लवकर तुम्हाला लेखी स्वरूपात झालेला प्रकरणाची माहिती कळवू व वंचित बहुजन आघाडी आंबेगाव तालुक्याचे शेकडो कार्यकर्त्यांसह तुफानी पावसामध्ये भिजत संघर्षाच्या पावली लांडेवाडी येथील असणारे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भेट देऊन सरपंच सौ संगीताबाई प्रदीप शेवाळे व उपसरपंच अंकुश शिवाजी लांडे यांना वंचित बहुजन आघाडी तर्फे दवाखान्यात झालेल्या प्रकाराबद्दल आपली भूमिका व आपण काय कारवाई केली ??
या संदर्भात लेखी स्वरुपात निवेदन देऊन प्रतिउत्तराची मागणी करण्यात आले, सरपंच व उपसरपंच यांनी आश्वासन दिले की आम्ही तुमच्या सोबत आहोत असे तोंडी आश्वासन त्यांनी दिले व वंचित बहुजन आघाडी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पावसामध्ये भिजत मंचर पोलीस ठाणे या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांसह उपस्थित राहून त्यांना सुद्धा जाब विचारण्यात आले की दोन महिने झाले असता दोषींवर कारवाई करण्यात का आली नाही ?? असे लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले व लांडेवाडी येथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सरकारी दवाखान्यांमध्ये झालेल्या महिलेच्या मृत्यूबाबत तक्रारी निवेदन देण्यात आले.
सदर डॉ.व कर्मचारी यांच्यावर आतापर्यंत कारवाई का झाली नाही ??असे विचारण्यात आले त्यावेळेस मंचर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री साळुंखे साहेब यांनी आमचे नेते शशिकांत भालेराव साहेब व आमचा वंचितचे ढाण्या वाघ प्रदिप गौतम साळवे व पुणे जिल्हा संघटक जावेद भाई मोमीन यांना व इतर शेकडो कार्यकर्त्यांना असा लेखी स्वरूपात दिले आहे की आम्ही तुम्हाला ससून हॉस्पिटल चा रिपोर्ट आल्यानंतर तातडीने बोलून घेऊ व दोषींवर कठोर कारवाई करू.वंचित बहुजन आघाडीला दिलेले आहे वंचित बहुजन आघाडीच्या वाघिणी खुडे मॅडम व इतर असणारे सर्व महिला मंडळ व कार्यकर्त्यांचा असा पवित्रा होता की दोषींवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही,तब्बल तीन तास भर पावसात उभे राहून हा प्रकार तिथे चालू असताना साळुंखे साहेब यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिल्यामुळे कार्यकर्त्यांनी घेतलेला पवित्रा बदलण्यात आले.लवकरात लवकर घटनेचा जर तपास होऊन दोषींवर कारवाई जर नाही झाली पीडित कुटुंबीयांनी आमरण उपोषण करण्याचा मानस ठेवलेला आहे या सर्व कार्यक्रमाच्या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी बरोबर लवांडे कुटुंबीय व त्यांच्या असणारे सर्व नातेवाईक व बौद्ध सेवा संस्थेचे मुंबई अध्यक्ष शशिकांत भालेराव साहेब वंचितचे ढाण्या वाघ प्रदिप गौतम साळवे, संविधान व्याख्याते करंदीकर साहेब, रोहिदास शेठ, दीपक भाऊ शिशुपाल, विलास जी देठे, फकीरा देठे, वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष पंकज भाऊ सरोदे व वंचित चे उपाध्यक्ष अनिल भाऊ गायकवाड, तालुका सचिव अविनाश रोकडे, ज्येष्ठ सल्लागार सहादू शेठ लवांडे तालुका संपर्कप्रमुख धनेश भाऊ राजगुरू, सुरेश भाऊ रोकडे, पेठ पारगाव चे अध्यक्ष मच्छिंद्र भाऊ लोखंडे, तालुका संघटक संभाजी राजे राजगुरू, महाळुंगे पडवळ अध्यक्ष रोहिदास शिशुपाल, मारुती साळवे,वशुभम भाऊ जेकटे, मधुकर शेठ चाबुकस्वार, महासचिव व जिल्हा संपर्कप्रमुख जावेद भाई मोमीन व चासगावचे संपूर्ण आव्हाड कुटुंब निमगाव सावा येथील खुडे मॅडम व त्यांच्याबरोबर आलेले स हे सर्व कार्यकर्ता व महिला,पत्रकार घोडेगाव शहराचे अध्यक्ष किशोरजी वाघमारे साहेब, रतनशेठ साबळे व मोठ्या प्रमाणामध्ये वंचितच्या वाघिणी महिला मंडळ मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला उपस्थित होत्या या सर्व शेकडो कार्यकर्त्यांसह लवांडे कुटुंबाच्या घरी भेट देण्यात आले दोशींवर कारवाई नाही झालीस आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबनाच कुटुंबीयांनी सांगितलेल्या आहे जोपर्यंत शिवाजी लवांडे यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी आंबेगाव तालुका व पूर्ण पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. काळजी करू नका असं आश्वासन प्रदिप गौतम साळवे व शशिकांत भालेराव, साहेब पंकज भाऊ सरोदे, धनेश भाऊ राजगुरू, जावेद भाई मोमीन, साधू शेठ लवांडे, यांनी लवांडे कुटुंबियांना आश्वासन देण्यात आले.
COMMENTS