विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) जुन्नर:येथील श्री शिवछत्रपती विद्यालयात विद्यार्थिनी कल्याण मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी प्रा विजयाताई...
विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
जुन्नर:येथील श्री शिवछत्रपती विद्यालयात विद्यार्थिनी कल्याण मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी प्रा विजयाताई मारोतकर (नागपूर)यांच्या 'पोरी जरा जपून' या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. किशोरवयीन मुलींनी स्वतःचे व्यक्तिमत्व घडविताना आजूबाजूच्या मोहांना बळी न पडता,सजग राहून स्वतःचे संरक्षण करावे.मोबाईलचा गैरवापर न करता स्वप्रगतीसाठी व स्वसंरक्षणासाठी करावा. मुलींना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारी प्रतिज्ञा घेऊन व्याख्यानाचा समारोप केला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे म्हणाले की 'मुलींनी स्वतःच अन्यायाविरुद्ध पेटून उठावे व स्वसंरक्षण करावे'. या प्रसंगी अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी.कुलकर्णी,उपप्राचार्य डॉ.आर.डी.चौधरी, उपप्राचार्या प्रा.पी.एस लोढा,पर्यवेक्षक प्रा.एस.ए. श्रीमंते,एम.सी.व्ही.सी विभाग प्रमुख प्रा.के.जी.नेटके,प्रा.एस.एम.इंगळे, प्रा.आर.एस.कांबळे,प्रा.ए.पी ढोले व सर्व महिला प्राध्यापिका उपस्थित होत्या.प्रा.सौ.के.के शिंदे यांनी प्रास्ताविक केले.प्रा.सौ.व्ही.एच.सावंत यांनी सूत्रसंचालन केले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.सौ.एम.डी. हाडवळे यांनी करून दिला. प्रा.सौ.एस.डी.सोनार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थिनी कल्याण मंडळाच्या सर्व सभासदांचे विशेष सहकार्य लाभले.
COMMENTS