🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮 *३९ कविचा उत्स्फूर्त सहभाग* !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! नागपूरच्या प्रतिभावंत ...
🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮
*३९ कविचा उत्स्फूर्त सहभाग*
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
नागपूरच्या प्रतिभावंत कवयित्री
*सरिता सातारडे* यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन संपन्न
🧤🧤🧤🧤🧤🧤🧤🧤🧤
D.B.A.अर्थातच *डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी भारत (रजि.)* व
*नागपूर विभागीय कमिटि* यांच्या
संयुक्तविद्यमाने बुधवार दि.९ आँगस्ट २०२३ रोजी क्रांतिदिना निमित्त शहिद सैनिकांना काव्यरूपी अभिवादन करण्यासाठी
*सैनिक हो तुमच्या साठी..!*
*राज्यस्तरीय आँनलाईन कविसंमेलन*
अतिशय उत्साहात संपन्न झाले.
यावेळी प्रथम
कविसंमेलनाध्यक्षा यांचा परिचय *निवेदिका प्रिती जीवने* यांनी आपल्या लोघवत्या भाषाशैली मध्ये केला.
त्यानंतर नागपूर विभागीय अध्यक्ष
*मा.सोपानदेव मशाखेत्री* यांनी कविसंमेलनाचा उद्देश स्पष्ट केला.
त्यानंतर सैनिकांना समर्पण करणारे
*सैनिक हो तुमच्यासाठी ...!*
हे स्फुर्तीगीत सहसंस्थापिका व संपादिका *मा.भावना खोब्रागडे* यांनी आपल्या मधुर आवाजात सादरीकरण करून वातावरण मंगलमय केले.
त्यानंतर कविसंमेलनाला मनोज जाधव सर यांनी शुभेच्छा देवून
सैनिकांना वंदन करणारी कविता सादरीकरण केली.
त्यानंतर महाराष्ट्रातील *३९ कविनी* आपल्या एकापेक्षा एक अशा सरस रचना सादरीकरण करून खर्या अर्थानं कवि संमेलनाची रंजकता वाढवली तर कविसंमेलनाध्यक्षा
*मा.सरिता सातारडे*
यांनी उत्तम असे मार्गदर्शन केले, व ९आँगस्ट क्रांतिदिनाचे महत्त्व किती महत्त्वाचे आहे. आणि ते आजच्या
नव्या पिढीला कळणे फार गरजेचं आहे.यावर अतिशय मौलिक मार्गदर्शन केले. तर *D.B.A* च्या सर्व आयोजकांचे विशेष कौतुक केले. व वास्तविक जीवनावर आधारित आपली कविता सादरीकरण केली.
एक ऐतिहासिक व नाविन्यपूर्ण ३८ वे कविसंमेलन अतिशय उत्साहात संपन्न झाले तर औरंगाबाद मधील प्रसिद्ध कवयित्री *मा.सुधा लेमाडे*
यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
आयोजक
D.B.A.
मा.भावना खोब्रागडे
सहसंस्थापिका व संपादिका
मा.मनोज जाधव सर
संस्थापक - अध्यक्ष
नागपूर विभागीय कमिटि
COMMENTS