बुधवार दिनांक २३ /०८ / २०२३ रोजी हनुमान मंदिर मुथाळणे येथे ग्रुप ग्रामपंचायत मांडवे - मुथाळणे या गावची ग्रामसभा आयोजित केली होती. या ग्रामसभ...
बुधवार दिनांक २३ /०८ / २०२३ रोजी हनुमान मंदिर मुथाळणे येथे ग्रुप ग्रामपंचायत मांडवे - मुथाळणे या गावची ग्रामसभा आयोजित केली होती. या ग्रामसभेस गावातील खूप मोठ्या प्रमाणात मतदार बंधू - भगिनी उपस्थित होते.या ग्रामसभेत अनेक विकास कामांना मंजुरी देण्यात आली.
त्याचबरोबर मांडवे -मुथाळणे गावच्या तंटामुक्ती कमिटीच्या अध्यक्ष पदाचीही निवड होती.या अध्यक्ष पदासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि माजी. तंटामुक्ती उपाध्यक्ष राहुल सोनवणे यांची पुन्हा एकदा महात्मा गांधी तंटामुक्ती कमिटीच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी श्री. मंगेश भांगरे यांची निवड करण्यात आली. ही ग्रामसभा लोकनियुक्त सरपंच मा. दामोदर गोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्याचबरोबर या ग्रामसभेचे सचिव म्हणून श्री. लक्ष्मण जोशी सर यांनी काम पाहिले.
मांडवे - मुथाळणे ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री. मच्छिन्द्र तळपे हे पण उपस्थित होते. त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, पेसा अध्यक्षश्री. बाळू गिजरे मांडवे गावचे पोलीस पाटील श्री. बबन दाभाडे, मुथाळणे गावचे पोलीस पाटील सौ. ज्योतीताई तळपे हे सर्वजण उपस्थित होते. या ग्रामसभेस मांडवे - मुथाळणे येथील मोठया प्रमाणात मतदार बंधू- भगिनी उपस्थित होते.
COMMENTS