सहसंपादक-प्रा.प्रविण ताजणे ( सर ) 15 ऑगस्ट 2023 रोजी 76 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल येथे शाळेचे ध्वजारोहण इयत्...
सहसंपादक-प्रा.प्रविण ताजणे ( सर )
15 ऑगस्ट 2023 रोजी 76 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल येथे शाळेचे ध्वजारोहण इयत्ता दहावीत उच्छिलमध्ये सर्वाधिक टक्केवारी मिळवून प्रथम येणाचा बहुमान मिळविणाऱ्या व शाळेसाठी आणि गावासाठी कौतुकास्पद व आभिमानास्पद आणि कायमस्वरूपी प्रेरणा मिळेल या उद्धात्त संकल्पनेतून तसेच गावातील सर्वानुमते मंजूर केलेल्या ठरावातून आज कु.जागृती शरद नवले सन 2018/19 च्या बॅचची असणारी आमची माजी विद्यार्थीनी हिच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी शाळेच्या प्रांगणात नव्याने उभारण्यात आलेल्या शिलालेखाचे उद्घाटन व पूजन उच्छिल ग्रुप ग्रामपंचायतीचे युवा लोकनियुक्त सरपंच श्री.मंगेशभाऊ आढारी यांच्या हस्ते संपन्न करुन पंचप्राण शपथ देण्यात आली. यानंतर स्वारथ्य फाऊंडेशन पुणे यांचे अध्यक्ष श्री. प्रथमेश तांबे सो यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व संचालक मंडळ आणि संस्थेचे संयोजक तसेच विशेष म्हणजे लेण्याद्री गणपती ट्रस्टचे अध्यक्ष श्री.जितेद्र बिडवई यांच्या प्रयत्नातून शाळेतील मुलांकरीता जवळपास एकावन्न हजार रुपये किंमतीचे पाणी शुध्दीकरण सयंत्र बसवून त्यांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यामुळे सर्व मुलांना यापुढील काळात स्वच्छ व शुद्ध पाणी मिळणार आहे. याचे समाधान व आभार उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या वतीने मानले.
अमृत महोत्सवानिमित्त ७५ वृक्ष लागवड करण्यासाठी श्री. सुनिल बगाड पोलीस पाटील व श्री.बबन केंगले चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी या मान्यवरांचे शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत गावातील माती श्री. शरद नवले अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती व श्री गणपत भालेराव उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनास देण्यात आली.
ग्रुप ग्रामपंचायत उच्छिल यांच्यावतीने शिवली कालदरे व उच्छिल या तिनही शाळाना स्मार्ट टि.व्ही. श्री मंगेशभाऊ आढारी सरपंच श्री. मारुती खिलारी उपसरपंच सदस्य श्री.बजरंग आढारी श्री.शंकर आढारी सौ कांचन नवले व सौ.अश्विनी साबळे ग्रामसेविका यांसकडून देण्यात आल्या.
तसेच या दिनाचे औचित्य साधून सिंहगड प्रतिष्ठाण व विप्रो कंपनी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक संगणक संच श्री.प्रशांत लोखंडे आदर्श शिक्षक नाणेघाट यांच्या माध्यमातून 77 वा स्वांतत्र्य दिन 15 ऑगस्ट 2023 च्या मुहर्तावर भेट देऊन शाळेमध्ये डिजीटल संकल्पनेस अधिक प्राधान्य देण्याकरीता आणि शैक्षणिकदृष्ट्या शाळा पश्चिम भागात सातत्याने अग्रेसर असल्याबाबत संगणक संच दिला असता उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने कौतुक करण्यात आले.
उच्छिल प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे ध्वजारोहन सारस्थ फाऊंडेशनचे सचिव श्री. सुधाकर डुंबरे यांच्या हस्ते तर शालेय मुलाकरीता शैक्षणिक कामकाजाकरीता 2501/- रुपये रोख स्वरुपात देणगी शाळेकडे सुपुर्त करण्यात आले तर पुजन सौ. सुप्रिया कानडे वैद्यकिय अधिकारी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
सर्व उद्घाटन समारंभानंतर बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सचिनशेठ विलास नवले सदस्य शालेय व्यवस्थापन समिती हे होते यानंतर सर्व व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करून मुलांची भाषणे झाली मुलांनीही खूप छान भाषणे केली व्यासपिठावरील सर्व उपस्थितांनी बक्षिसे दिली. समस्त ग्रामस्थ यांसकडून शालेय सुविधांकरीता 2100/- देणगी तर 20000 रुपये विविध सुविधांकरीता देण्यात आले यासाठी शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार मानले. ग्रामस्थ मनोगते व अध्यक्षीय भाषण झाले कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील मान्यवरांमध्ये श्री. बबनशेठ नवले चेअरमन दूध संस्था, श्री. पांडूरंग नवले चेअरमन, पुणे जिल्हा नाभिक संघटनेचे अध्यक्ष श्री आत्माराम शिंदे , श्री. गणपत बांबळे श्री. गुलाब आढारी व चंद्रकांत शेळकंदे संचालक श्री विलास नारायण नवले मा. ग्रामपंचायत सदस्य श्री. सावकार नवले श्री. पांडूरंग भालेराव देवेश नवले अतुल नवले सुधीर नवले मयुर शिंदे हरिभाऊ शिंदे प्रविण नवले शालेय व्यवस्थापन सदस्या रेश्मा केंगले सविता आढारी कांचन नवले आदी मान्यवर व पालक आणि तरुण मंडळ मोठया संख्येने उपस्थित होते या सर्वांचे आभार सौ स्मिता ढोबळे यांनी मानले तर कार्यक्रमाचे संयोजन सौ लिलावती नांगरे व सौ आरती मोहरे यांनी तर प्रास्ताविक व स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री अन्वर सय्यद यांनी केले तर आभार व सुत्रसंचलन श्री.सुभाष मोहरे यांनी मानले
याप्रसंगी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ,पालक, महिला, अंगणवाडी ताई,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS