सहसंपादक- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) मंगळवार दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त सकाळी ०७ :३० वाजता लेण्याद्री येथे ध्वजारोहण ...
सहसंपादक- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
मंगळवार दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त सकाळी ०७ :३० वाजता लेण्याद्री येथे ध्वजारोहण करण्यात आले. लेण्याद्री गणपती मंदिरात फुलांमध्ये तिरंगा ध्वज साकारण्यात आला होता व लेण्याद्री परिसरात तिरंगा कलर मध्ये फुग्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.सलग सुट्ट्या असल्यामुळे दिवसभर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. लेण्याद्री परिसरात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. सकाळी ०७:३० वाजता देवस्थानचे यात्री निवास भाग नंबर दोन येथे माजी सैनिक सुभाष बिडवई व रामदास मेहेर यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव ठाकरवाडी येथील विद्यार्थ्यांना वृक्षाची रोपे व खाऊवाटप करण्यात आले. यानंतर गोळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ध्वजारोहण संपन्न झाले. देवस्थानचे वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना वृक्षाची रोपे देण्यात आली. सायंकाळी जुन्नर तालुक्यातील माजी सैनिकांचे शुभहस्ते लेण्याद्री पायथा येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता मंदिरात माजी सैनिकांचे शुभहस्ते श्रींची महाआरती करण्यात आली. त्यानंतर देवस्थानच्या वतीने जुन्नर तालुक्यातील सर्व माजी सैनिकांना सन्मानपत्र ,महावस्त्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी माजी सैनिक महादेव हडवळे, देविदास भुजबळ, रमेश खरमाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांनी केले तर आभार उपाध्यक्ष संजय ढेकणे यांनी मानले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. देवस्थानच्या वतीने सर्व माजी सैनिकांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, उपाध्यक्ष संजय ढेकणे, सचिव शंकर ताम्हाणे, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त प्रभाकर जाधव, गोविंद मेहेर, मच्छिंद्र शेटे, सदाशिव ताम्हाणे, प्रभाकर गडदे, जयवंत डोके, भगवान हांडे, कार्यालयीन सचिव रोहिदास बिडवई, गोळेगावच्या पोलीस पाटील कविता बिडवई, ग्रामपंचायत सदस्य पल्लवी वाणी, छाया ढेकणे, जुन्नर तालुक्यातील माजी सैनिक संघाचे अध्यक्ष देविदास भुजबळ, उपाध्यक्ष दिलीप आरोटे, सेक्रेटरी नवनाथ गाढवे, रामदास मेहेर व तालुक्यातील सर्व माजी सैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सलग सुट्ट्या असल्याने लेण्याद्री परिसरात दिवसभर भाविकांची तसेच पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. येणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना देवस्थान ट्रस्टमार्फत विविध सेवा पुरवण्यात आल्या. भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे याकरिता देवस्थानचे वतीने गर्दीचे नियोजन करण्यात आले होते. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. तसेच पुणे, नगर, मुंबई ,ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सचिव शंकर ताम्हाणे यांनी दिली
COMMENTS