घंगाळदरे : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील घंगाळदरे येथील दलित वस्तीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने दलित वस्तीकडे जाता येत नव्हते मात्र य...
घंगाळदरे : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील घंगाळदरे येथील दलित वस्तीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने दलित वस्तीकडे जाता येत नव्हते मात्र या रस्त्याचा मागील अकरा वर्षांपासून तीन पिढ्यांचा या रस्त्याचा वाद सुरू होता.
दरम्यान घंगाळदरे येथील दलित वस्तीतील लोकांना पावसाळ्यात जाताना येताना त्रास सहन करावा लागत होता, लहान मुलांना जेष्ठांना जाताना तसेच शेतमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठी कसरत करूनच जावे लागत होते, मात्र या रस्त्यासंदर्भात तहसिलदार सबनीस साहेब जुन्नर, यांनी ६ फुट रूंदीचा व ३० मीटर लांबीच्या रस्त्याला खुले करण्यासाठी आदेश दिला, अखेर १ ऑगस्ट २०२३ रोजी पोलिस संरक्षणात सर्कल पोटकुले साहेब तसेच गावकामगार तलाठी जाधव साहेब, पोलिस जमादार भोजने साहेब व पोलिस पाटिल, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत या रस्त्याच्या कामाला सुरूवात करून स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व्हे बांधावरून जेसीबीच्या सहाय्याने रस्ता करून घेतला, अखेर २०१३ पासून सुरू असलेल्या रस्त्याच्या वादाला अखेर पडदा पाडत राज्यस्तरीय महसूल दिन व महसूल सप्ताह सुरू असून या दिवशी घंगाळदरे येथील दलित वस्ती येथील रस्ता तहसिल आदेशान्वये सर्कल पोटकुले साहेब यांनी सदर रस्ता खुला करून दिला. त्याबद्दल त्यांचे घंगाळदरे ग्रामस्थांनी व दलित वस्तीतील नागरीकांनी महसूल प्रशासन व पोलिस प्रशासनाचे यांचे आभार मानले.
COMMENTS