जुन्नर – जुन्नर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट ) यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. जुन्नर तालुक्या...
जुन्नर
– जुन्नर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट ) यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना
वह्या वाटप करण्यात आले. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील बोतार्डे, आमलेवाडी,
खुबी व कोळवाडी येथील जि. प. प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्याच्या
अमृतमहोत्सवी सांगता दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
जुन्नर तालुका अध्यक्ष पोपट राक्षे, ज्येष्ठ समाजसेवक संभाजी साळवे, उपाध्यक्ष सुरेश
खरात, युवा अध्यक्ष प्रविण लोखंडे यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे
वाटप करण्यात आले.
बोतार्डे
येथील जि. प. प्राथमिक शाळा आमलेवाडी येथील शाळेतील मुलांना वह्या व लाडू देण्यात
आले, यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भालचिम सर उपस्थित होते, नंतर बोतार्डे येथील शाळेतील
मुलांना वह्या व लाडू देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले, यावेळी ज्येष्ठ
समाजसेवक संभाजी साळवे, अध्यक्ष पोपट राक्षे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, यावेळी
मान्यवरांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन जि. प. प्राथमिक शाळेच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी शाळेच्या शिक्षिका तळपे मॅडम व ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते. सूत्रसंचालन सतिश शिंदे यांनी केले तर आभार
रेखा मोहिते मुख्याध्यापिका यांनी मानले.
खुबी
येथील जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व लाडू देत सभेचे आयोजन करून
या सभेत ज्येष्ठ समाजसेवक संभाजी साळवे व पोपट राक्ष यांनी मनोगत व्यक्त केले, यावेळी
उपाध्यक्ष सुरेश खरात, युवा अध्यक्ष प्रविण लोखंडे, मते सर, तसेच ग्रामस्थ यावेळी
उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार समारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व
आभार साबळे सर यांनी मानले.
कोळवाडी
येथील जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सांगता
दिनानिमित्त वह्या व लाडू देऊन विद्यार्थ्यांना ज्य़ेष्ट समाजसेवक संभाजी साळवे, अध्यक्ष
पोपट राक्षे, तसेच इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमप्रसंगी मान्यवरांचा
मान सन्मान सत्कार शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी युवा अध्यक्ष
प्रविण लोखंडे, उपाध्यक्ष सुरेश खरात, सतिश शिंदे ( पत्रकार ), शिक्षिका व ग्रामस्थ मोठ्या
संख्येने यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डुंबरे सर यांनी केले तर
आभार शालेय समिती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुमकर यांनी आभार मानले.
COMMENTS