जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील बोतार्डे येथील आमलेवाडी ( ढाकोबा ) मंदिराशेजारील मुख्य दळणवळणाच्या रस्त्यावरून काल रात्रीच्या सु...
जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील बोतार्डे येथील आमलेवाडी ( ढाकोबा ) मंदिराशेजारील मुख्य दळणवळणाच्या रस्त्यावरून काल रात्रीच्या सुमारास एका दुचाकीस्वारावर वाघाने झडप घेत दुचाकीस्वार रस्त्यावर पडून मोठ्या प्रमाणात जखमी झाला आहे.
सविस्तर माहिती अशी की, काल शनिवार दिनांक १२ ऑगस्ट २०२३ रोजी निलेश हिरामण उघडे राहणार घंगाळदरे हा तरूण कामावरून येत असताना तांबे येथे मित्रांना सोडवून परत येत होता रात्री १० ते १०.३० च्या दरम्या ढाकोबा येथील रस्त्यावरून जात असताना वाघाने दुचाकीच्या समोरच्या बाजूला जोराची धडक दिल्याने निलेश उघडे हा डांबरी रस्त्यावर पडला त्याच्या हाताला तोंडाला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या आहेत, दरम्यान वाघाने तेथून पळ काढला निलेश घाबरल्याने त्याने गाडी कशी तरी उचलून तशीच सुरू करून घरी गेला.
मात्र अशावेळी सुनसान रस्ता असल्याने हि घटना घडली असे निलेश याने सांगितले.
खरं तर वनविभागाने या वाघांचा बंदोबस्त करावा अशी त्याने मागणी केली कारण वाघांच्या हल्ल्यात प्राणी व माणसांचे जीव देखील गेलेले आहेत अशा कितीतरी घटना तालुक्यात घडल्या आहेत.
यामुळे याची वेळीच दखल घ्यावी असे उघडे यांनी क्राईमनामा लाईवला मुलाखत देताना सांगितले.
COMMENTS