प्रतिनिधी : आंबेगाव भारतीय बौद्ध महासभा शाखा आंबेगाव तालुका व बौद्ध विकास तरूण मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 103...
प्रतिनिधी : आंबेगाव
भारतीय बौद्ध महासभा शाखा आंबेगाव तालुका व बौद्ध विकास तरूण मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती वळती येथे साजरी करण्यात आली.
भारतीय बौद्ध महासभा शाखेच्यावतीने श्रावण पौर्णिमेनिमित्त मासिक मिटींग आयोजित करण्यात आली होती.त्यामध्ये पौर्णिमेचे महत्व हा विषय बौध्दाचार्य नरेश कसबे यांनी सांगितले तर प्रवचन पराभव सुत्त या विषयावर महेश वाघमारे यांनी प्रवचन केले.सरपंच आनंद वाव्हळ यांनी आण्णाभाऊ साठे यांचे विषयी माहिती दिली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळशिराम अभंग होते.
प्रमुख उपस्थितीत पंकज सरोदे, तानाजी अस्वारे, गौतम खळे, राजू शेवाळे, पंकज खुडे, संदीप मिरके, दिनेश भालेराव, गणेश भालेराव, प्रकाश मिरके, श्रीधर भालेराव, बाळू पांडुरंग गायकवाड, वसंत वाव्हळ संतोष शेवाळे, विलास डोळस सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश वाघमारे यांनी केले तर आभार सचिन ढोणे यांनी मानले.
COMMENTS