वडगाव सहानी आज दिनांक 01 जुलै 2023 रोजी जि. प. शाळा वडगाव सहाणी येथे शिक्षक पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीच...
वडगाव सहानी
आज दिनांक 01 जुलै 2023 रोजी जि. प. शाळा वडगाव सहाणी येथे शिक्षक पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून श्री अमोल ज्ञानेश्वर तांबोळी तर उपाध्यक्ष म्हणून सौ कल्याणीताई राजेंद्र वाबळे यांची निवड करण्यात आली.
नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार शाल व गुलाबपुष्प देऊन गावच्या प्रथम नागरिक सौ वैशालीताई भाऊसाहेब तांबोळी व माजी उपसरपंच श्री खंडेराव विश्राम शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच माझी अध्यक्ष श्री रमेश महाराज वाबळे यांचा देखील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या मेळाव्यामध्ये पालकांनी विविध समस्या मांडल्या. पालकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती कटिबद्ध असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे नवनियुक्त अध्यक्ष श्री अमोल ज्ञानेश्वर तांबोळी व उपाध्यक्ष सौ कल्याणताई राजेंद्र वाबळे यांनी पालकांना ग्वाही दिली. सदर मेळाव्याचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र बेलवटे सर यांनी केले तर सर्व मान्यवरांचे आभार उपशिक्षक श्री बाळासाहेब बांबळे सर यांनी मानले.
COMMENTS