जुन्नर : जुन्नर तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून जुन्नर बस स्थानक ओळखले जाते. मात्र या बस स्थानकातील विविध समस्यां संदर्भात रिपब्लिकन पार...
जुन्नर
: जुन्नर तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून जुन्नर बस स्थानक ओळखले जाते. मात्र
या बस स्थानकातील विविध समस्यां संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट )
जुन्नर तालुका यांच्या वतीने गुरूवार दिनांक ७ जुलै २०२३ रोजी एकदिवसीय उपोषण
धरण्यात आले होते.
या
उपोषणामध्ये 1.जुन्नरचे एस. टी बस स्थानकाची ( नविन जुना ) डागडुजी करून संपूर्ण परिसर
सिमेंट कॉंक्रीटने सुव्यवस्थित करावा.
2.
आजूबाजूच्या जागेवर वनखात्यामार्फत आयताकृती फुलझाडे, हिरवळ करून परिसर सुंदर करावा.
3.
जे कंडक्टर, ड्रायव्हर सायंकाळी विश्रांतीसाठी थांबलेले असतात त्यांचे खोलीत स्वच्छतागृह,
डबल बेडची कॉट, स्नानगृह, स्वच्छतागृह असावे. पुरूष – महिला कक्ष स्वतंत्र असावा.
सार्वजनिक स्वच्छतागृह सुशोभित असावे.
4.
कायमस्वरूपी स्वच्छता करणेसाठी कर्मचारी वर्ग असावा.
5.
सर्व गावांतील बस थांबेची सुधारणा करावी.
6.
बस स्थानकातील भोजनालये, आजूबाजूची दुकाने दिव्यांग, परित्यक्ता, विधवा व महिला मंडळाला
देण्याची किंवा अनुसूचित जाती जमातीच्या गरजूंकरीता देणेत यावी.
7.
जुन्नर, नारायणगाव बस स्थानकातील 1- 2 गुंठ्यात श्रमिक किंवा प्रवासी निवासाची व्यवस्था
करणेसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवासी निवासगृहाची निर्मिती किंवा आदिवासी
श्रमिक भवनाची निर्मिती करावी.
या
वरील मागण्यांकरीता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट ) जुन्नर तालुका
यांच्या वतीने जुन्नर बस स्टँड या ठिकाणी उपोषणाला बसले होते. यावेळी या
उपोषणादरम्यान अनेक मागण्यांचे निवेदन
घेऊन या ठिकाणी ते उपोषणाला बसलेले होते.
तालुकाध्यक्ष पोपट राक्षे, संभाजी साळवे, उपाध्यक्ष
सुरेश खरात, वसंत साळवे अनिल सोनवणे, विजय
बनकर या उपोषणात सहभागी होते.
या
वेळी तालुकाध्यक्ष पोपट राक्षे यांनी जुन्नर बस स्थानकाच्या संदर्भातील निवेदन वाचून
दाखवत बस स्थानकाची सुधारणा करावी असे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले, तसेच संभाजी
साळवे यांनी आगार व्यवस्थापक यांच्या समोर वरील निवेदनातील मागण्या करत आपल्या रोखठोक
शैलीतून प्रश्नांची विचारणा केली, उपाध्यक्ष सुरेश खरात यांनी देखील आपले मनोगत व्यक्त
केले, अनिल सोनवणे यांनी देखील बस स्थानकातील दुर्दशेबाबत रोखठोक मुद्दे मांडले.
आगार
व्यवस्थापक, सुर्यवंशी, वाहतूक व्यवस्थापक कालेकर, वाहतूक व्यवस्थापक जुन्नर साबळे
यांनी वरील मागण्या मान्य करून लवकरच या बाबत तातडीने निर्णय घेतले जातील अशा आशयाचे
पत्र दिले.
यावेळी
जुन्नर तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट ) जुन्नर कार्यकर्ते मोठ्या
संख्येने यात सहभागी होते, तसेच गावोगावचे ग्रामस्थ देखील उपस्थित होते, जुन्नर पोलिस
स्टेशनचे लोहकरे साहेब, पत्रकार प्रशांत धोत्रे, सतिश शिंदे यावेळी उपस्थित होते.
COMMENTS