पुणे : लग्न झाल्यानंतर पुन्हा ड्युटीवर हजर राहिल्यानंतर आठ दिवसात स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केलेला जेल कर्मचारी अमोल मुरलीधर माने (व...
पुणे : लग्न झाल्यानंतर पुन्हा ड्युटीवर हजर राहिल्यानंतर आठ दिवसात स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केलेला जेल कर्मचारी अमोल मुरलीधर माने (वय २८) याच्या मृत्यु मागील कारण समोर आले आहे.
प्रेमसंबंधातून त्याने ही आत्महत्या केली असून, येरवडा पोलिसांनी त्याच्या प्रेमिकेसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पल्लवी दिनकर धुमाळ (रा. जेल वसाहत), दिनकर रंगोबा धुमाळ (वय ५७, रा. विजय पार्क, विद्यानगर), प्रतिक दिनकर धुमाळ, रोहिदास मुरलीधर निगडे (वय ५२), सोहम निगडे, रोहित साहु लॅबवाला अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिस उपनिरीक्षक भगवान सदाशिव गुरव यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार येरवडा कारागृहात २७ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेचार वाजता घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल माने आणि पल्लवी धुमाळ यांचे प्रेमसंबंध होते. पल्लवी हिने लग्नास नकार दिला होता. दरम्यान इतरांनी अमोल याच्या रुमवर जाऊन येथून निघून जा, तुला सस्पेंड करीन, नोकरीवरुन काढीन, अशी धमकी देऊन शिवीगाळ करुन मानसिक त्रास देत होते. तसेच पोलिसात तक्रार दिल्यास तू एकटाच येथे राहत आहेस, मारुन टाकील अशी धमकी देत होते.
अमोल माने याने त्यानंतर दुसर्या मुलीसोबत लग्न केले. लग्नासाठी तो आपल्या गावी नगरला गेला होता. जानेवारी महिन्यात त्याचे लग्न झाले. सुट्टीनंतर तो परत आला. तेव्हा आरोपींनी अमोल यास तु लग्न कसे काय केले. तुझी बदनामी करतो, खोटा गुन्हा दाखल करतो, असे बोलून मारहाण केली. त्यातून त्याच्यावर दडपण आले होते.
२७ फेब्रुवारी रोजी तो गार्ड ड्युटीवर असताना त्याने स्वत: जवळच्या एस एल आर मधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक कांचन जाधव पुढील तपास करीत आहेत.
COMMENTS