Pune Places to Visit : तुम्ही पुण्यात राहत असाल आणि सध्या तुम्ही फिरण्याचे ठिकाण शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी आजच्या या लेखात काही उत्तम ठ...
Pune Places to Visit : तुम्ही पुण्यात राहत असाल आणि सध्या तुम्ही फिरण्याचे ठिकाण शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी आजच्या या लेखात काही उत्तम ठिकाणे घेऊन आलो आहोत जिथे तुम्ही तुमचा विकेंड प्लॅन करू शकता.
पुणे हे असे ठिकाण जिथे वर्षातील सर्व १२ महिने पर्यटक भेट देण्यासाठी येतात. महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणे आहेत जी पाहण्यासारखी आहेत. अशातच एक पुणे शहर.
पुणे हे भारतात राहण्यासाठी सर्वोत्तम शहरांपैकी एक मानले जाते. पुणे शहर मॉल्स, थीम पार्क, क्लब यासह अनेक भेट देण्याच्या ठिकाणांनी भरलेले आहे. तसेच पुण्याजवळ अशी अनेक ठिकाणे आहेत जी पाहण्यासारखी आहेत. पुण्याजवळ तुम्हाला विविध हिल स्टेशन्स, पिकनिक स्पॉट्स आणि मंदिरे पाहायला मिळतील. चला तर मग पुण्यातील काही खास ठिकाणे जाणून घेऊया-
पुण्याजवळील काही प्रसिद्ध ठिकाणे :-
शिवनेरी किल्ला
Shivneri Fort
पुण्याजवळ असेलला शिवनेरी किल्ला भेट देण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. शिवाजी राजांचे जन्मस्थान म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला त्रिकोणी आकाराचा आहे, जो सामान्य किल्ल्यांपेक्षा खूपच असामान्य आहे, म्हणूनच हे ठिकाण पर्यटकांसाठी खूपच खास आहे, येथे दरवर्षी हजारो पर्यटक भेट देण्यासाठी येतात. जुन्नरमध्ये बांधलेला हा १७ व्या शतकातील जुना किल्ला आहे. या किल्ल्याला एकूण 7 दरवाजे आहेत. शिवनेरी किल्ला हे पुण्याजवळचे प्रसिद्ध ट्रेकिंगचे ठिकाण आहे.
पर्वती टेकडी मंदिर
parvati hill
पार्वती टेकडी मंदिर हे पुण्यातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे, ज्यामध्ये १७ व्या शतकात बांधलेली प्राचीन मंदिरे आहेत. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 2,100 फूट उंचीवर आहे. या ठिकाणाहून तुम्ही पूर्ण पुणे शहर पाहू शकता. जर तुम्ही नवीन ट्रेकर्स असाल तर येथून तुम्ही तुमच्या ट्रेकिंगची सुरुवात करू शकता. येथे येण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च. येथे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत येऊ शकता.
एम्प्रेस गार्डन
impress garden
तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर पुण्याचे एम्प्रेस गार्डन हे खरोखरच तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. या ठिकाणी तुम्हाला विविध दुर्मिळ प्रजातींची झाडे आणि फुले पाहायला मिळती. प्रेमी युवकांसाठी हे ठिकाण अगदी उत्तम आहे. येथे तुमच्या कुटुंबासोबत देखील येऊ शकता. येथे तुम्ही खासकरून ऑक्टोबर ते मार्च यादरम्यान भेट देऊ शकता.
पश्चिम घाट
Western Ghats
पश्चिम घाट हे त्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे, येथे तुम्हाला घनदाट जंगले, धुके असलेले पर्वत, अप्रतिम दर्या पाहायला मिळतील. येथे तुम्हाला निसर्ग अगदी जवळून पाहायला मिळेल. येथे तुम्हाला अनेक धबधबेही पाहायला मिळतील. तसेच आल्हाददायक आणि प्रसन्न वातावरणाचा आनंद देखील घेता येईल. तसेच तुम्ही येथे पावसाळ्यात जाऊ शकता पण येथे भेट देण्यासाठी उत्तम काळ हा ऑक्टोबर ते मार्च दरम्यानचा आहे.
COMMENTS