आरोग्य टिप्स : दुधाला सुपरफूड म्हणतात. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन शरिराला अनेक फायदे मिळतात. वेलची पावडर मिक्स करून दूध पिणे शरीराच्...
आरोग्य टिप्स : दुधाला सुपरफूड म्हणतात. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन शरिराला अनेक फायदे मिळतात. वेलची पावडर मिक्स करून दूध पिणे शरीराच्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते. जाणून घ्या वेलचीयुक्त दुधाचे सेवन करण्याचे फायदे –
बुद्धी, मेंदूची कार्यक्षमता वाढते
नियमितपणे दुधात वेलची पावडर मिक्स करून पिल्याने शरीर निरोगी राहते तसेच मेंदू आणि शरीराची कार्यक्षमता वाढते.
हाडांचे आरोग्य सुधारते
दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे हाडे आतून बळकट होतात तसेच वेलचीमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम आढळते जे दुधात मिसळून दुप्पट होते. म्हणूनच, विशेषतः वयोवृद्ध लोकांनी वेलचीयुक्त दुधाचे सेवन करावे.
पोटाचे आरोग्य व्यवस्थित राहते
पचन प्रक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी वेलचीयुक्त दुधाचे सेवन करणे लाभदायक आहे. दुध आणि वेलची दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. फायबर पचनासाठी उपयुक्त असते.
सर्दी कमी होते
वेलचीयुक्त दुधाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच सर्दी खोकला देखील कमी होतो.
कॅन्सरचा धोका कमी
कॅन्सरच्या पेशींविरोधात लढणाऱ्या पोषक तत्त्वांचा वेलचीमध्ये समावेश आहे. यातील घटक शरीरामध्ये कॅन्सर पेशींची निर्मिती होण्यापासून रोखण्याचे कार्य करतात. त्यामुळे वेलचीयुक्त दुधाचे सेवन केल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो
रक्तदाब, हृदयरोग
दूध आणि वेलचीमध्ये मॅग्नेशियम जास्त प्रमाणात आढळते. वेलचीयुक्त दुधाचे सेवन केल्याने रक्तदाब व्यवस्थित राहतो आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.
COMMENTS