आरोग्य टिप्स : कोरफडीचा गरामध्ये एक चमचा कॅस्टर ऑईल एकत्रित करा. ही पेस्ट केसांना लावून रात्रभर ठेवा आणि सकाळी शाम्पूने केस धुवा. यामुळे के...
आरोग्य टिप्स : कोरफडीचा गरामध्ये एक चमचा कॅस्टर ऑईल एकत्रित करा. ही पेस्ट केसांना लावून रात्रभर ठेवा आणि सकाळी शाम्पूने केस धुवा. यामुळे केसांची वाढ होते.
* कोरफडीचा रस प्यायल्यास हिरड्यांना आलेली सूज कमी होते.
* पोटात आग होत असल्यास किंवा छातीत जळजळ होत असल्यास कोरफडीच्या गरामध्ये मध मिसळवा आणि हे मिश्रण थोड्या थोडा प्रमाणात चाटणासारखं चाटा.
* चेहऱ्यावर जर पिंपल्स असतील तर कोरफडीच्या गरात लिंबाचा रस टाकून मिश्रण बनवा आणि हे मिश्रण रात्रभर चेहऱ्याला लावून ठेवा. सकाळी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.
* त्वचेला कोरफडीचा गर लावल्यास त्वचा कोरडी पडत नाही शिवाय व्रणही निघून जातात.
* कोरफडीचा गर मधासोबत घेतल्यास कफाचा त्रास कमी होतो.
* कोरफडीच्या गरामध्ये २ चमचे आवळ्याचा रस मिसळून दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास डायबिटीज नियंत्रणात राहण्यास मदत होते.
COMMENTS