हिवतापvप्रतिरोध महिना जून 23 या मोहिमेच्या अंतर्गत जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, जुन्नर पंचायत समितीच्या, तालुका आरोग्य अधिकारी...
हिवतापvप्रतिरोध महिना जून 23 या मोहिमेच्या अंतर्गत जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, जुन्नर पंचायत समितीच्या, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वर्षा गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यक्षेत्रात 1 जून ते 30 जून 23 कालावधीत हिवताप व डेंग्यु, चिकुनगून्या, जे.ई, हत्तीरोग इत्यादी किटकजन्य आजारा विषयी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
त्यानुषंगाने प्रा.आ.केंद्र सावरगाव येथील वैद्यकीय अघीकारी डॉ.जाहिद जाफरी व डॉ. दिपाली भवारी व हिवताप तालुका पर्यवेक्षक तथा प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी दिलीप कचेरे यांचे मार्गदर्शनाखाली सावरगाव येथे हिवताप प्रतिरोध महिना हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी आरोग्य पर्यवेक्षक, दिलीप कचेरे यांनी उपस्थितांना हिवताप, चिकून गुन्या, डेंग्यु, जे. ई. झिका, हत्तीरोग इत्यादी आजार होऊ नयेत म्हणून काय काय काळजी घ्यावी? याची सविस्तर माहिती दिली. तर आरोग्य सहाय्यक विजय दिवटे यांनी साथीच्या विविध आजारा बाबत घ्यावयाची काळजी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास सावरगाव बीट च्या अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.जाहिद जाफरी, डॉ.दिपाली भवारी, पर्यवेक्षक दिलीप कचेरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मिताली, आरोग्य सहाय्यक विजय दिवटे, शिवपुत्र कोळी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अफसर शेख,नम्रता साळवे,आरोग्य सहायिका छाया घोडे,डाटा ऑपरेटर सविता दातखिळे, परिचर उज्वला गवारी, वाहन चालक संतोष ढमढेरे, आशा कार्यकर्ती रोहिणी भगत इत्यादीचे योगदान लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप कचेरे यांनी केले तर शिवपुत्र कोळी यांनी आभार प्रदर्शन केले.
COMMENTS