सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) रविवार दि.०४/०६/२०२३ रोजी अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्था...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
रविवार दि.०४/०६/२०२३ रोजी अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थान या ठिकाणी श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट गोळेगाव, विश्वशांती धाम निर्माण संस्था श्री क्षेत्र वेरुळ अंतर्गत जय बाबाजी भक्त परिवार व भारतीय पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी श्री क्षेत्र लेण्याद्री परिसर, मंदिर परीसर, दर्शन मार्ग, वाहनतळ, लेण्याद्री फाटा ते लेण्याद्री पायथा रस्त्याच्या दुतर्फा या ठिकाणाची स्वच्छता करण्यात आली.
स्वच्छता अभियानांतर्गत ५४ गोणी प्लास्टिक कचरा व प्लास्टिक बॉटल तसेच पालापाचोळा सेवेकऱ्यानी जमा केला. स्वच्छता अभियानाचा शुभारंभ सकाळी ७.०० वाजता श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष संजय ढेकणे, सचिव शंकर ताम्हाणे, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त गोविंद मेहेर, प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, सदाशिव ताम्हाणे, जयवंत डोके, भगवान हांडे, देवस्थानचे व भारतीय पुरातत्व विभागाचे कर्मचारी व जय बाबाजी भक्त परिवाराचा सेवा दल मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सचिव शंकर ताम्हाणे यांनी दिली.
COMMENTS