प्रतिनिधी : नवनाथ मोरे जुन्नर : गिरीमानस आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हातवीज आणि दुर्गावाडी या शाळेतील १ ली ते ...
प्रतिनिधी : नवनाथ मोरे
जुन्नर : गिरीमानस आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हातवीज आणि दुर्गावाडी या शाळेतील १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यामध्ये स्कूल बॅग, वह्या, कंपास पेटी, रेनकोट, ड्रेस यांचा समावेश होता. १ ली ते ४ थी हा विद्यार्थ्याचा पाया असतो. हा पाया मजबूत कसा बनेल तसेच दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती पाहिजे तितकी सक्षम नसते. या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित न राहत उत्तम दर्चाचे शिक्षण मिळाले पाहिजे. या उद्देशाने या साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी गिरिमानसचे जिल्हा सचिव डॉ. आशिष मेरूकर, SFI पुणे जिल्हा कमिटी सदस्य राजू शेळके, जुन्नर तालुका सचिव अक्षय घोडे, उपाध्यक्षा निशा साबळे, सूरज बांबळे व गावातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
यावेळी शिक्षक सुरेश पारधी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. तर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल सुपे यांनी आभार मानले.
COMMENTS