प्रतिनिधी : नवनाथ मोरे आंबेगाव : पंचाळे खुर्द येथील समीर गारे याने एमएच सेट या राज्य पातळीवर घेतलेल्या सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षेत...
प्रतिनिधी : नवनाथ मोरे
आंबेगाव : पंचाळे खुर्द येथील समीर गारे याने एमएच सेट या राज्य पातळीवर घेतलेल्या सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षेत समाजकार्य विषयात पहिल्याच प्रयत्नांत यश संपादन केले आहे. समीर गारे हे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आंबेगाव तालुका समितीचे सचिव व पुणे जिल्हा सहसचिव म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काम करत असतात. यासोबत ते ग्रूप ग्रामपंचायत पंचाळे बुद्रुक चे सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत.
त्यांनी कर्वे समाजसेवा संस्था पुणे येथून समाजकार्य विषयात पदव्युत्तर पदवी चे शिक्षण घेतले आहे. हे शिक्षण घेत असताना त्यांनी 'आंबेगाव तालुक्यातील शासकीय पशुवैद्यकीय सेवा सद्यस्थितीचा अभ्यास' या विषयात संशोधन प्रकल्प पूर्ण केला आहे.
सद्यस्थितीत ते आदिम संस्कृती अभ्यास, संशोधन व मानव विकास केंद्र येथे कार्यरत आहेत. विद्यार्थी चळवळीतील अभ्यास आणि संघर्षाची शिकवण घेऊन त्यांनी हे यश मिळविले आहे.
COMMENTS