प्रतिनिधी : जुन्नर आर.पी.आय पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त दि ग्रेट कार्यकर्ता सन्...
प्रतिनिधी : जुन्नर
आर.पी.आय पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त दि ग्रेट कार्यकर्ता सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते.
या सन्मान सोहळ्यानिमित्त गौतम लोखंडे जिल्हा उपाध्यक्ष आर.पी.आय. पुणे जिल्हा यांना दि ग्रेट कार्यकर्ता सन्मान पुरस्काराने सूर्यकांत वाघमारे यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले तसेच संपत गायकवाड आर.पी.आय.सरचिटणीस जुन्नर तालुका, मारूती वारे आर.पी.आय.कार्याध्यक्ष जुन्नर तालुका, बाळासाहेब खरात आर.पी.आय.सहसचिव जुन्नर तालुका यांना कार्यकर्ता सन्मान पुरस्कार सूर्यकांत वाघमारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
तसेच यावेळी स्म्रृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन सर्वांना गौरविण्यात आले.
या सन्मान सोहळ्यानिमित्त वाघमारे यांनी कार्यकर्त्यांना स्वावलंबी बनून पक्ष उभारणीसाठी तळागाळातील जनतेच्या समस्या व अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करावा असे त्यांनी आपल्या मनोगतामधून भावना व्यक्त केल्या.
या वेळी पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष संभाजी साळवे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा व तालुक्यातील अनेक पदाधिकारी तसेच पक्षाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS