जुन्नर : जुन्नर तालुक्यात नुकतीच पावसाला सुरुवात झाली आहे.अनेक ठिकाणी खड्डे, टायर, बॅरेल, शौचालया जवळील टाक्या, छतावरील भंगार,कुंड्या, तुळ...
जुन्नर : जुन्नर तालुक्यात नुकतीच पावसाला सुरुवात झाली आहे.अनेक ठिकाणी खड्डे, टायर, बॅरेल, शौचालया जवळील टाक्या, छतावरील भंगार,कुंड्या, तुळशी वृंदावन, नारळाच्या करवंट्या इत्यादी ठिकाणी पावसाचे पाणी साठायला सुरुवात झाली आहे.तसेच सध्याचे हवामान डासांच्या वाढीला पोषक असून, त्याद्वारे डेंग्यु, चिकून गुन्या, झिका,हिवताप, जे. ई.व हत्तीरोगासारखे किटकजन्य आजार होण्याचा मोठा धोका असतो.त्यामुळे डास नियंत्रणावर वेळीच प्रतिबंध व्हावा म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे , जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वर्षा गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुक्यात विविध ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत जागरण चालू आहे. त्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपाली भवारी व तालुका हिवताप पर्यवेक्षक दिलीप कचेरे यांचे माध्यमातून सावरगाव, काचळवाडी,बस्ती याठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
दि.28 जून 2023 रोजी श्री ज्ञानेश्वर विद्यालय येथे इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव येथील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी तथा तालुका आरोग्य पर्यवेक्षक दिलीप कचेरे यांचे हसत खेळत डासांवर पाळत विषयावरील आणि अत्यंत विनोदी पद्धतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितीत सर्वांना सहज सुंदर, विद्यार्थ्यांना समजेल अशा आणि विनोदी शैलीतून डासांच्या जाती, त्याद्वारे होणारे आजार, व त्यावरील उपाय योजना याबाबत, प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रसिद्ध व्याख्याते दिलीप कचेरे यांनी आपल्या व्याख्यानात, आपला परिसर स्वच्छ ठेवावा,आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा,पाणी साठे व्यवस्थित झाकून ठेवावे,ताप आल्यास ताबडतोब सरकारी दवाखान्यात उपचारासाठी यावे, कोणताही ताप अंगावर काढू नये, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये. नारळाच्या करवंट्या, जुने टायर, अडगळीत पडलेले भंगराचे साहित्य ताबडतोब नष्ट करावेत अथवा पाणी साठणार नाही अशा ठिकाणी ठेवावेत अशा महत्वपूर्ण सूचना उपस्थित त्यांना दिल्या.
विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल साळुंखे सर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तर विद्यालयाचे पांडुरंग गवारी सर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सावरगाव येथील सुप्रसिद्ध निवेदक व पत्रकार रामकृष्ण भागवत, विद्यालयातील सर्व कर्मचारी व 396 विद्यार्थी उपस्थित होते.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.दिपाली भवारी,आरोग्य सहाय्यक विजय दिवटे,शिवपुत्र कोळी, आशा कार्यकर्ती रूपाली ढमढेरे, शोभा शिंदे इत्यादी उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव येथील आरोग्य सहाय्यक विजय दिवटे व शिवपुत्र कोळी यांनी शासन आपल्या दारी अंतर्गत मधुमेह, उच्च रक्तदाब, मनोहर डोळे फाउंडेशन नारायणगाव येथील तज्ञा मार्फत नेत्र तपासणी, आभा कार्ड याबाबत व प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध कार्यक्रमाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालय सावरगाव येथील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष योगदान लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक पांडुरंग गवारी सर यांनी केले तर जयवंत कडाळे सर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
COMMENTS