क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याचे दळणवळणाचे मुख्य ठिकाण जुन्नर बस स्थानक परिसर म्हणून ओळखला जातो, जुन्नर तालुक्याला स्वच्छतेच्या निमित्तान...
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याचे दळणवळणाचे मुख्य ठिकाण जुन्नर बस स्थानक परिसर म्हणून ओळखला जातो, जुन्नर तालुक्याला स्वच्छतेच्या निमित्ताने देशपातळीवरील पुरस्कार देखील मिळाला आहे. मात्र या बस स्थानकातील अवस्था सध्या फार दयनीय स्वरूपाची झालेली आहे.
या बस स्थानकामधील शौचालयांमध्ये पाणी नसल्याने तसेच शौचालयातील वॉशरूमची नळी तुटल्याने यातील पाणी शौचालयाच्या आवारात पसरल्यामुळे प्रवाशांना येताना जाताना या सर्वत्र सांडलेल्या पाण्यातून मार्ग काढूनच आत बाहेर पडावे लागत आहे, या गोष्टीची शौचालयातील कर्मचार्यांना कल्पना दिली असता त्यांनी हे काम आमचे नसल्याचे व दररोज साफसफाई कोण करेल अशा स्वरूपाचे उडवाउडवीचे उत्तर दिले, वास्तविक या ठिकाणची स्वच्छता नगरपरिषद जुन्नर यांच्या विभागाने करण्याची गरज असताना ते मात्र स्वच्छता टाळताना दिसत आहेत.
या बस स्थानकावर महाराष्ट्रातील असंख्य पर्यटक तालुक्यातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी येत असतात मात्र बस स्थानकातील या दयनीय अवस्थेमुळे पर्यटकांची गैरसोय होत असल्याचे देखील काही पर्यटकांनी सांगितले.
या बस स्थानकात जुन्नरच्या विविध भागातील गावांतील नागरीक, प्रवासी व महिला बाजारानिमित्त येत असतात, प्रवाशांना शौचालयात जाताना नाकातोंडावर रूमाल धरूनच जावे लागत आहे.
या परिसरात प्लॅस्टिक पिशव्या, दारूच्या बाटल्या व इतर कचर्याचा राडारोडा पडला असून नगरपरिषद जुन्नर स्वच्छता विभागाच्या कर्मचार्यांनी येथील स्वच्छता करण्याची मागणी प्रवासी महिला करत आहेत.
COMMENTS