क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील कांदळी गावातील केरू कोंडाजी रोकडे यांच्या मालकी हक्काच्या सिटी सर्व्हे नं. १२८ या जमिनीत...
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील कांदळी गावातील केरू कोंडाजी रोकडे यांच्या मालकी हक्काच्या सिटी सर्व्हे नं. १२८ या जमिनीतील ५०२ चौ.मी.जागेत अनधिकृतपणे बांधकाम केलेबद्दल रोकडे हे आज मंगळवार दिनांक २३ मे २०२३ रोजी जुन्नर तहसिल कार्यालयाबाहेर प्राणांतिक उपोषणास बसले आहेत.
सविस्तर मथळा असा की, केरू कोंडाजी रोकडे वय वर्ष ८० यांची कांदळी येथे वडिलोपार्जित जमिन असून सदर जागेची त्यांनी कायदेशिररित्या मोजणी करून या जागेचे सातबारे देखील जोडलेले असताना सदर जागेत कांदळी गावातीलच सचिन मारूती रोकडे, संग्राम मारूती रोकडे, संदिप गेने रोडे, प्रकाश सिताराम रोकडे मनोहर सिताराम रोकडे, बबन ठकाजी रोकडे पांडूरंग गीरजू रोकडे, नारायण गीरजू रोकडे, प्रविण सावळेराम रोकडे, छोटू मधुकर रोकडे सर्व राहणार कांदळी ता.जुन्नर जि.पुणे यांनी कारण नसताना केरू कोंडाजी रोकडे यांच्या मालकी हक्काच्या जागेत अतिक्रमण केले असल्याचे पोलिस स्टेशन नारायणगाव, सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या निदर्शनास आणून दिले मात्र न्याय न मिळाल्याने रोकडे यांनी तहसिल कार्यालय जुन्नर येथे प्राणांतिक उपोषण धरले असून जोपर्यंत सदर अतिक्रमण करणार्या लोकांवर कार्यवाही होत नाही व योग्य न्याय मिळेपर्यंत उपोषण धरणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.
रोकडे यांनी पत्रात सांगितले की, त्यांचे जिवितास बरे वाईट झाल्यास संबंधित यंत्रणा जबाबदार राहिल अशाप्रकारचा इशारा रोकडे यांनी दिला आहे.
या उपोषणाला सामाजिक कार्यकर्ते संभाजी साळवे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जुन्नर तालुका अध्यक्ष पोपट राक्षे, उपाध्यक्ष सुरेश खरात व कार्यकर्त्यांनी जाहिर पाठींबा दिला आहे.
COMMENTS