सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : समर्थ टोयोटा केंद्रास मान्यवरांची भेट विद्यार्थ्यांचे केले कौतुक समर्थ औदयोगिक प्रश...
सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : समर्थ टोयोटा केंद्रास मान्यवरांची भेट
विद्यार्थ्यांचे केले कौतुक
समर्थ औदयोगिक प्रशिक्षण संस्था बेल्हे व टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा.लि.यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारांतर्गत टोयोटा किर्लोस्कर मोटार या कंपनीच्या माध्यमातून समर्थ शैक्षणिक संकुलात ऑटोमोबाईल बॉडी रिपेअर व ऑटोमोबाईल पेंट रिपेअर हे दोन रोजगाराभिमुख अभ्यासक्रम कार्यान्वित करण्यात आलेले आहेत.
या टोयोटा प्रशिक्षण केंद्रास नुकतीच टोयोटा कंपनीच्या हार्ट टचिंग गेस्ट एक्स्पेरियन्स विभागाचे डेप्युटी जनरल मॅनेजर तन्मय भट्टाचार्य व डेप्युटी मॅनेजर अतुल आदक यांनी भेट दिली.यावेळी विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमांतर्गत केलेल्या प्रात्यक्षिक कौशल्य निरीक्षण केले.प्रशिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले वं सर्वांचे कौतुक केले.
सदर अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभावान आणि तांत्रिकदृष्ट्या कुशल व्यावसायिक निर्मिती करण्याच्या उद्धेशाने टोयोटा तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम (TTEP)सुरु करण्यात आला आहे.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्याना प्रशिक्षण देणे व उद्योगात यशस्वी होण्यास सक्षम करणे हा आहे.
ऑटोमोबाईल बॉडी रिपेअर व ऑटोमोबाईल पेंट रिपेअर हे एक-एक वर्षाचे अभ्यासक्रम प्रशिक्षण व तांत्रिक शिक्षण विभाग,एन सी व्हि टी दिल्ली सरकारच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेले आहेत.या अभ्यासक्रमात १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ऑटोमोबाइल बॉडी व पेंट यासंदर्भात मूलभूत कौशल्य त्याचबरोबर दुरुस्ति तंत्रज्ञानाबद्दलचे ज्ञान,नवनवीन तंत्रज्ञान याबाबत प्रशिक्षण देण्यात येते.तसेच सदरचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी साठी टोयोटा मार्फत प्लेसमेंट च्या भरपूर संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
या संकुलामध्ये सर्व अद्ययावत प्रशिक्षण उपकरणे, प्रशिक्षण सामग्री,साधने,तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन इत्यादी सर्व प्रकारच्या सुविधा प्रदान केलेल्या आहेत.
डेप्युटी जनरल मॅनेजर तन्मय भट्टाचार्य म्हणाले की,टोयोटा तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाने समृद्ध करून प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्याचा उद्देश आहे.
यावेळी आय टी आय आणि टोयोटा च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या टाकाऊ पासून उपयुक्त वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
मान्यवरांच्या हस्ते सामूहिकरीत्या वृक्षारोपण केले व टोयोटा वर्कशॉप मधील विविध विभागांना भेट देऊन विद्यार्थी निर्मित प्रदर्शनाची पाहणी केली.
संकुलातील टोयोटा केंद्रास यापूर्वी बेस्ट कायझन अवॉर्ड देऊन गौरविण्यात आलेले आहे.या कौशल्याधिष्ठित व रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाने विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य असल्याचे डेप्युटी मॅनेजर अतुल आदक म्हणाले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य पांडुरंग हाडवळे,उप प्राचार्य विष्णू मापारी,बीसीएस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,पॉलिटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले,समर्थ इन्स्टिट्युट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर आदी उपस्थित होते.
COMMENTS