धाराशिव : परंडा तालुक्यातील एका गावातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन युवकांनी घरात व शेतात वारंवार अत्याचार केल्याने पीडित गर्भवती राहिल्या...
धाराशिव : परंडा तालुक्यातील एका गावातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन युवकांनी घरात व शेतात वारंवार अत्याचार केल्याने पीडित गर्भवती राहिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे. दुसरा आरोपी फरार असून, पोलिस तपास करत आहेत.
आरोपींनी आई-वडीलांना जीवे मारण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी (नाव - गाव गोपनीय), ता. परंडा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार, गावातीलच आरोपी युवक व १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी शेजारी शेजारी राहत होते. युवकाने भाजी घेण्याच्या बहाण्याने येऊन अत्याचार केला. आई-वडीलांचे हात-पाय तोडण्याची धमकी दाखवत दोन वेळा लैंगिक अत्याचार केला. गावातील नदी शेजारील झाडीत तू मला आवडतेस तू माझ्याशी लग्न करणार का? असे विचारले असता पीडितेने नकार दिल्याने बळजबरीने झाडीत ओढत (नाव गोपनीय) अत्याचार केला.
या प्रकारानंतर फिर्यादीच्या पोटात दुखू लागल्याने व ताप आल्याने खाजगी रुग्णालयात तपासणी केली असता पीडिता ही तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाल्याने कुटुंबियांना धक्काच बसला. या प्रकरणी पीडीतेने परंडा पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्या वरून संशयित दोघांविरुद्ध परंडा पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. दोघांपैकी एक संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे तर दुसरा आरोपी फरार आहे.
COMMENTS