प्रतिनिधी : नवनाथ मोरे जुन्नर : किसान सभेच्या प्रयत्नांतून आणि गोद्रे ग्रामपंचायत व गोद्रे गावाच्या महिला वर्गाच्या पुढाकाराने गोद्रे गावात ...
प्रतिनिधी : नवनाथ मोरे
जुन्नर : किसान सभेच्या प्रयत्नांतून आणि गोद्रे ग्रामपंचायत व गोद्रे गावाच्या महिला वर्गाच्या पुढाकाराने गोद्रे गावात मनरेगा अंतर्गत पाणंद रस्त्याच्या कामास सुरुवात झाली. कामाचे उद्घाटन किसान सभेचे गाव समिती अध्यक्षा प्रियंका उतळे याच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामसेवक ढोरे यांनी मनरेगा अंतर्गत कामाची माहिती दिली. हा एकमेव कायदा आहे की, पुरुष असो की स्त्री यांना समान कामाला समान वेतन देते. तसेच मजूरी मजूरांच्या थेट बँक खात्यात जमा होते.
यावेळी गोद्रे गावचे उपसरपंच दिलीप गायकवाड, ग्रामपंचायत सदस्या दिपाली उतळे, गोद्रे गावचे रोजगार सेवक जयराम भोजने व 15 मजूर महिला उपस्थित होत्या.
COMMENTS