सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) तीर्थक्षेत्र पारुंडे (ता.जुन्नर ) येथील श्री ब्रह्मनाथ विद्या मंदिरातील सन १९८७ च्या एस. एस.सी. च्या ...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
तीर्थक्षेत्र पारुंडे (ता.जुन्नर ) येथील श्री ब्रह्मनाथ विद्या मंदिरातील सन १९८७ च्या एस. एस.सी. च्या माजी विद्यार्थी - विद्यार्थिनींनी सावरगाव येथील मातोश्री गार्डन मध्ये माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित केला होता. याप्रसंगी या माजी विद्यार्थ्यांचे वर्गशिक्षक साईनाथ ढोले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सेवा निवृत्त मुख्याध्यापक महादेव फुंदे, वसंतराव पवार, सखाराम ससाणे, भगवान जुन्नरकर, फकीर आतार, ज्येष्ठ विषय शिक्षिका मंदा पवार, प्राथमिक शाळेतील वर्गशिक्षक शिरतर गुरुजी, त्याचबरोबर इतर कर्मचारी वृंदांमध्ये काशिनाथ आनंदराव, आनंदा मोदे, हरिश्चंद्र जाधव,आदि गुरुजन उपस्थित होते.
तब्बल जवळपास ३६ वर्षांनी सर्व वर्गमित्र- मैत्रिणी व त्यांना शिकविणारे वर्गशिक्षक, विषय शिक्षक असे सर्व गुरुजन एकत्र आल्याने वातावरण भारावून गेले होते. या स्नेह मेळाव्यामुळे शालेय जीवनातील जुन्या आठवणी सांगताना सर्वजण मंत्रमुग्ध झाले होते. यावेळी सर्व गुरुजनांचे स्वागत गिताने व टाळ्यांच्या गजरात झाले. सरस्वती प्रतिमेचे सामूहिक पूजन झाल्यानंतर शाळेतील प्रार्थनेने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. उपस्थित गुरुजनांना लोकमान्य टिळक पगडी, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देता- देता आपल्या मनातील भावनांना वाट करून दिली. एकत्र स्नेहभोजन व शालेय आठवणींना उजाळा देत प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली. उपस्थित गुरुजनांनी देखील अशा उपक्रमाची आवश्यकता सांगताना आपल्या विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. हा स्नेह मेळावा यशस्वी होण्यासाठी नवनाथ ताजणे, किसन जाधव, धनाजी मोदे, शांताराम गायकवाड, सुनिल डेरे, राजेंद्र पवार, कमल पुंडे, योगिनी पारुंडेकर, सुरेखा पवार, गोरक्ष बुचके अशा अनेक माजी विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी गवारी यांनी सूत्रसंचालन किसन जाधव तर आभार योगिनी पारंडेकर यांनी व्यक्त केले. सामूहिक पसायदानानंतर स्नेह मेळावा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
COMMENTS