सहसंपादन:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : बेल्हे येथील समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित, समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे (बां...
सहसंपादन:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : बेल्हे येथील समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित, समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे (बांगरवाडी) येथील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल मार्फत नुकत्याच आयोजित केलेल्या प्लेसमेंट ड्राईव्ह २०२३ अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील विद्यार्थ्यांची मदरसन ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग, चाकण (पुणे) या नामांकित कंपनीत निवड झाल्याची माहिती प्राचार्य अनिल कपिले यांनी दिली.
मदरसन कंपनीच्या वतीने असिस्टंट मॅनेजर प्रतीक लोखंडे यांच्या मार्फत मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये असलेले कौशल्य, काम करण्याची जिद्द आणि निष्ठा तसेच संभाषण कौशल्य, सॉफ्ट स्किल व सकारात्मक दृष्टिकोन या बाबींचा विचार मुलाखतीद्वारे निवड करताना केल्याचे कंपनीचे असिस्टंट मॅनेजर प्रतीक लोखंडे यांनी सांगितले.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग विभागातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे :
यश सरोदे, अभिषेक काशीद, उत्तम काशीद, प्रवीण घोलप, संकेत शिंदे, निखिल खराडे, श्रेयस बढे, पूरषोत्तम बनकर.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे : अभिषेक टटू, आकाश अडगळे, शुभम पिंगट, साहिल गावडे, आर्यन डुंबरे, सुदर्शन डोंगरे, सुजल वाघ, पवन गुंजाळ, प्रतीक शिंदे, वैभव भालेराव, अनिकेत ठाणगे.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे:
अद्वैत खोराळे, शिवांग वाळुंज, ऋषिकेश डहाळे, ओम डोंगरे, ऋषिकेश औटी, कुणाल तांबे, अभिजीत डोंगरे, अनिल गुंजाळ, सुरज वारुळे, अभिषेक गाढवे, ओम आहेर, सुजित औटी, जय गाजरे.
सदर प्लेसमेंट साठी ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.संकेत विघे, शैक्षणिक समन्वयक प्रा.संजय कंधारे विभाग प्रमुख प्रा.आदिनाथ सातपुते, प्रा.महेंद्र खटाटे, प्रा.संदीप त्रिभुवन, प्रा.नंदकिशोर मुऱ्हेकर, प्रा.हुसेन मोमीन प्रा.आशिष झाडोकर, प्रा.माधवी भोर आदींनी परिश्रम घेतले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके यांनी अभिनंदन केले.
COMMENTS